भारत - बांगलादेश दुसऱ्या टेस्ट मॅचवर पावसाचं सावट, सामन्यावर कसा होणार परिणाम? पाहा Weather Report
IND VS BAN 2nd Test Weather Updates : 27 सप्टेंबर पासून भारत - बांगलादेश यांच्यात दुसरा टेस्ट सामना कानपुर येथे खेळवला जाणार आहे. परंतु या दरम्यान कानपुर येथे पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
IND VS BAN 2nd Test Weather and Pitch Report: भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवण्यात येणार आहे. यापैकी चेन्नई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशवर 280 धावांनी विजय मिळवला. यासह सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी सुद्धा घेतली. 27 सप्टेंबर पासून भारत - बांगलादेश ( India VS Bangladesh ) यांच्यात दुसरा टेस्ट सामना कानपुर येथे खेळवला जाणार आहे. परंतु या दरम्यान कानपुर (Kanpur) येथे पावसाची दाट शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तेव्हा टेस्ट सामन्याच्या पाचही दिवशी कानपुर येथील हवामान कसं असेल याविषयी जाणून घेऊयात.
कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा सामना खेळवण्यात येणार आहे. 27 सप्टेंबर पासून हा सामना खेळवण्यात येणार आहे. Accuweather.com च्या माहितीनुसार टेस्ट सामन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी कानपूरमध्ये 92 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर तापमान हे 29 अंश सेल्सियस पर्यंत राहणार असं बोललं जातंय. तसेच संपूर्ण दिवस आकाशात ढग दाटून येथील तर 32 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहतील.
तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता : (IND vs BAN 2nd Test Weather Report)
Accuweather.com च्या माहितीनुसार टेस्ट सामन्याच्या पहिल्या तिनही दिवशी पावसाची शक्यता आहे. पहिल्या दिवशी 92 टक्के, दुसऱ्या दिवशी 80 तर तिसऱ्या दिवशी 59 टक्के पाऊस पडू शकतो. तर शेवटच्या दोन दिवस 3 आणि 1 टक्के पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी पाऊस पडल्यास दोन्ही संघांची डोकेदुखी वाढू शकते.
हेही वाचा : अजिंक्य रहाणेला सरकारकडून मोठं गिफ्ट! क्रिकेट अकादमीसाठी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी भूखंड मंजूर
भारत विरुद्ध बांगलादेश दुसरी टेस्ट कुठे पाहता येणार फ्री?
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील दुसरा आणि शेवटचा टेस्ट सामना हा शुक्रवार 27 सप्टेंबर पासून सुरु होईल. या सामन्याचे लाईव्ह टेलिकास्ट स्पोर्ट्स 18 चॅनेलवर दाखवण्यात येईल. तर डिजिटल यूजर्स जिओ सिनेमा अँप आणि वेबसाईटवर सुद्धा याचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. भारत - बांगलादेश दुसरा टेस्ट सामना हा डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर फ्रीमध्ये लाईव्ह पाहता येईल. जे डीडी स्पोर्ट्स चॅनेल केबल टीव्ही किंवा डीटीएच प्लॅटफॉर्म जसे की डिशटीव्ही, एअरटेल डिजिटल टीव्ही आणि टाटा प्लेवर प्रसारित होईल तेथे भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सामन्याचे थेट प्रक्षेपण होणार नाही.
भारत - बांगलादेश संघ : (IND vs BAN Playing XI)
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
बांगलादेश संघ : नजमुल हुसैन शांतो (कर्णधार),शादमन इस्लाम, जाकिर हसन, मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, जाकिर अली, तस्कीन अहमद, हसन महमूद, नाहिद राणा, ताइजुल इस्लाम, महमूदुल हसन, नईम हसन और खालिद अहमद.