अजिंक्य रहाणेला सरकारकडून मोठं गिफ्ट! क्रिकेट अकादमीसाठी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी भूखंड मंजूर

Ajinkya Rahane Alloted Land In Mumbai : कॅबिनेटने मुंबईच्या वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणावरील एक भूखंड अजिंक्य रहाणे याला देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुजा पवार | Updated: Sep 23, 2024, 06:57 PM IST
अजिंक्य रहाणेला सरकारकडून मोठं गिफ्ट! क्रिकेट अकादमीसाठी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी भूखंड मंजूर  title=
(Photo Credit : Social Media)

Ajinkya Rahane Alloted Land In Mumbai : भारताचा मराठमोळा स्टार क्रिकेटर अजिंक्य रहाणेसाठी याला महाराष्ट्र सरकारने एक मोठी मदत केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोमवार 23 सप्टेंबर रोजी मुंबईत पार पडली. या बैठकीत कॅबिनेटने मुंबईच्या वांद्रे येथील मोक्याच्या ठिकाणावरील एक भूखंड अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याला देण्याचा निर्णय घेतला आहे. या भूखंडावर एक जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी आणि सुसज्य क्रीडा सुविधा उभारण्याचे ध्येय रहाणेचे आहे. कॅबिनेट बैठकीतील या निर्णयानंतर अजिंक्यने सुद्धा एक्स अकाऊंटवरून ट्विट करत आभार मानले. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार हा भूखंड म्हाडाच्या मालकीचा असून गेली अनेक वर्ष तो क्रिकेट अकादमीसाठी आरक्षित होता. या भूखंडावर क्रिकेट अकादमी उभारण्यासाठी माजी क्रिकेटर सुनिल गावस्कर उत्सुक होते. मात्र 1988 मध्ये त्यांनी येथे क्रिकेट अकादमी सुरु करण्यात असमर्थता दाखवली. त्यानंतर त्याचे वितरण 2022 मध्ये म्हाडाने रद्द केले. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे खजिनदार आणि विधानसभेचे आमदार आशिष शेलार यांनी जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी  उभारण्यासाठी हा भूखंड क्रिकेटर अजिंक्य रहाणे याला देण्यात यावा अशी मागणी मुंबई मंडळाकडे केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीत अखेर याला कॅबिनेटने मंजुरी दिली. 

अजिंक्य रहाणेने मानले आभार : 

अजिंक्य रहाणेने पोस्टमध्ये लिहिले, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार यांचे खूप खूप आभार, त्यांनी जागतिक दर्जाची क्रिकेट अकादमी उभारण्याच्या माझ्या व्हिजनला पाठिंबा दिला. ही अकादमी तरुण खेळाडूंना उच्च दर्जाच्या सुविधांसह सक्षम करेल. ज्या शहरात माझा क्रिकेट प्रवास सुरु झाला त्या शहरातील पुढच्या पिढीच्या चॅम्पियन्सला प्रोत्साहन मिळेल. महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही दिलेल्या प्रोत्साहनासाठी आणि नेतृत्वासाठी मी कृतज्ञ असेल".   

हेही वाचा  : विराट कोहली क्रिकेट मॅच खेळताना कोणते बूट वापरतो? किंमत ऐकून धक्काच बसेल

 

अजिंक्य रहाणेची कारकीर्द :

अजिंक्य रहाणे हा भारताचा स्टार फलंदाज असून त्याने काही सामन्यात टीम इंडियाचे नेतृत्व सुद्धा केले आहे. अजिंक्य रहाणे याने भारताकडून 85 टेस्ट क्रिकेटमध्ये 5077 धावा, 90 वनडेमध्ये 2962 धावा केल्या तर २० टी २० सामन्यात 375 धावा केलाय आहेत. अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे सुद्धा नेतृत्व केले असून सध्या तो चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळत आहे. अजिंक्यने आयपीएलमध्ये 4642 धावा केल्या आहेत. क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये अजिंक्य रहाणेच्या नावावर 15 शतक आहेत.