Virat Kohli : बादशाहत कायम! कोहलीचे `विराट` शतक
IND vs BAN 3rd ODI : भारत विरुद्ध बांगलादेश तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात सलामीवीर इशान किशनने शानदार द्विशतक करत सचिन, सेहवाग, रोहित यांच्या पंगतीत स्थान मिळवले.
IND vs BAN 3rd ODI : भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना चटोग्राम (Chattogram) येथील झहूर अहमद चौधरी स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) खेळला जातो. बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात भारताकडून सर्वात जलद 150 धावा करणारा तो फलंदाज ठरलाय. याचदरम्यान भारताचा माजी कर्णधार आणि रनमशीन अशी ओळख असलेला विराट कोहली विक्रमावर विक्रम करत चालला आहे. सध्या त्याने असाच एक विक्रम आपल्या नावावर केला असून या सामन्यात विराट कोहलने 85 बॉलवर 103 रन केले आहे.
बांगलादेश विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवन आणि ईशान किशन हे मैदानावर उतरले होते. यावेळी धवन 3 धावांवर तंबूत परतला. मात्र, किशन खेळपट्टीवर टिकून राहिला आणि संघासाठी धावा काढल्या. त्यानंतर विराट कोहलीने देखील शतक झळकावले असून विराट कोहलीने आपले 44 वे वनडे शतक पूर्ण केले आहे. तर एकदिवसीयमध्ये 72 वे शतक झळकावले. त्याने 85 चेंडूत एक षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. इशानच्या द्विशतकानंतर कोहलीच्या शतकामुळे भारताची धावसंख्या 350 धावांच्या जवळ पोहोचली आहे. शिखर धवन बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. त्याने इशान किशनला साथ देत मैदानात कायम राहिला. ईशान किशन आणि विराटने 250 अधिक धावांची भागीदारी केली. विराटने 85 चेंडूत 103 धावा केल्या. यात त्याने 11 चौकार आणि 1 षटकार मारला.