IND vs BAN : टीम इंडिया आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यात पहिला कसोटी सामना सूरू आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशला 513 धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग बांगलादेश करत आहे. आता या सामन्यात टीम इंडिया बांगलादेशला (Bangladesh) ऑल आऊट करून विजय मिळवते की बांगलादेश हे आव्हान पुर्ण करून विजय मिळवतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि बांगलादेश (India Vs Bangladesh) यांच्यातील कसोटी सामन्याचा आजचा चौथा दिवस आहे. या चौथ्या दिवशी बांगलादेशच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली होती. खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी 100 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी तोडण्यात टीम इंडियाचा गोलंदाज उमेश यादवला (Umesh Yadav) यश आले आहे. उमेश यादवने नझमुल हुसेनला (Najmul Hossain Shanto) 67 धावावर बाद केले. विशेष म्हणजे हुसेनची ही विकेट टीम इंडियाच्या हातून निसटली होती, मात्र ऋषभ पंतने चपळाईने ती भारताला मिळाली.


व्हिडिओत काय? 


बांगलादेशने (Bangladesh) चौथ्या दिवशी 42 धावांच्या पुढे खेळाला सुरुवात केली होती. बांगलादेशच्या ओपनर्सनी पहिल्या विकेटसाठी 124 धावा केल्या होत्या. यावेळी टीम इंडियाकडून 47 वी ओव्हर टाकायला उमेश यादव (Umesh Yadav) आला होता. उमेश यादवने या ओव्हरमध्ये बांगलादेशला पहिला धक्का दिला.उमेश यादवचा बॉल नझमुल हुसेनच्या बॅटला कट लागून थेट पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या (Virat Kohli) हातात गेला. मात्र विराटच्या हातातला बॉल उडाला, आणि तो विकेटकिपर ऋषभ पंतच्या (Rishabh Pant) नजीक गेला. यावेळी मोक्याचा फायदा घेत पंतने कॅच घेतली. अशाप्रकारे विराटच्या हातून सुटलेली कॅच पंतने घेतली आणि लाज राखली. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.



शुभमन गिलच्या 110 आणि चेतेश्वर पुजाराच्या 102 धावांच्या शतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने (Team India) बांगलादेशसमोर 513 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशच्या 176 धावावर 3 विकेट पडल्या आहेत. दोन्ही संघाकडे खेळासाठी उद्याचा दिवस देखील आहे.त्यामुळे हा सामना कोण जिंकतो, हे पाहावे लागणार आहे.