IND VS BAN : टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्घ (India vs Bangladesh) दोन सामन्यांची टेस्ट सामना खेळतेय. या सामन्यात टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. या सामन्याचे नेतृत्व रोहित शर्माच्या अनुपस्थित के एल राहूल (KL Rahul) करतोय. त्यात राहूलच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असे असताना आता टीम इंडियाचा आणखीण एक खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. हा खेळाडू कोण आहे, हे जाणून घेऊयात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियात एकीकडे सलामीवीर केएल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्या लग्नाच्या चर्चा सुरु आहेत, तर दुसरीकडे आणखीण एक स्टार खेळाडू देखील लग्नबंधनात अडकण्याची तयारी करतोय. हा खेळाडू  शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) आहे. शार्दूल ठाकूर लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.  


कधी आहे लग्न?


गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात शार्दूल ठाकूरचा गर्लफ्रेंड मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत साखऱपूडा पार पडला होता. मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये त्यांचा साखरपूडा झाला होता. या साखरपूड्यानंतर लवकरच ते लग्नबंधनात अडकण्याची चर्चा होती. मात्र त्याने वर्षभराचा वेळ घेतला आणि आता ते लग्न बंधनात अडकणार आहेत. शार्दूल गर्लफ्रेंड मित्ताली परुळकर (Mittali Parulkar) सोबत पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात लग्न करणार असल्याची माहिती आहे.  


'लग्न सोहळा 25 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या कार्यक्रमात 200-250 पाहुणे उपस्थित राहणार आहेत. लग्नाचे मुख्य कार्यक्रम कर्जतमध्ये होणार असल्याची माहिती मित्तालीने दिली आहे. शार्दुल (Shardul Thakur) टीम इंडियाच्या शेड्यूलमुळे व्यस्त असल्याने लग्नाची सर्व तयारी मी करतेय.शार्दुल लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमाला पोहोचणार आहे, असे मित्तालीने सांगितले आहे.  


दरम्यान याआधी आम्ही गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग करायचं ठरवलं होतं पण लॉजिस्टिक आणि खूप लोकांमुळे सगळ्या व्यवस्थेत खूप अडचणी आल्या असत्या. या कारणामुळे आम्ही कर्जतमध्ये विवाह सोहळा आयोजित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील तिने शेवटी सांगितले आहे. 


कोण आहे मिताली?


शार्दुलची (Mittali Parulkar) होणारी पत्नी मिताली परुळकर ही एक बिजिनेस वुमन आहे. मिताली परुळकर ठाण्यात ऑल द बेक्स नावाची स्टार्टअप कंपनी चालवते. तर शार्दुल ठाकूर हा मुळचा पालघरचा आहे. त्याने क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत टीम इंडियात स्थान मिळवले होते. 


दरम्यान बांगलादेश विरूद्धच्या टेस्ट सामन्यात शार्दूल ठाकूरचा (Shardul Thakur) संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र त्याला पहिल्या सामन्यात संघात स्थान मिळाले नव्हते. आता 22 डिसेंबर पासून होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याला संधी मिळते का हे पाहावे लागणार आहे.