चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना आजपासून सुरू झाला आहे. हा कसोटी सामना चेन्नईतील चेपॉक मैदानात सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच एकामागोमाग एक तीन धक्के मिळाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभम गिल, कर्णधार विराट कोहलीला एकही रन काढण्यात यश आलं नाही. मैदानात येताच त्यांना इंग्लंडच्या संघातील गोलंदाजांनी माघारी धाडलं. त्यामुळे क्रिकेटप्रेमींची मोठी निराशा झाली. तर रोहित शर्मानं आपल्या तुफान आणि जोरदार फलंदाजीनं सर्वांची मन जिंकली आहेत. 


रोहित शर्माने 130 चेंडूमध्ये शतकी खेळी केली आहे. दरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारले. रोहितच्या कसोटी कारकीर्दीचे हे 7 वे शतक आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रोहितची कामगिरी विशेष चांगली नव्हती. मात्र दुसऱ्या कसोटीमध्ये त्यानं याचा बदला घेत शतकी खेळी केली आहे. 



भारतीय संघाचे 51 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 185 रन झाले आहेत. रोहित शर्मान 129 रन तर अजिंक्य रहाणेनं 35 रन काढले आहेत. सध्या अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा खेळत आहेत.


दुपारच्या जेवणानंतर भारतीय फलंदाज रोहित शर्मा आणि रहाणे यांनी शानदार कामगिरी बजावत संघाची सूत्रे हाती घेतली. लंचनंतर इंग्लंडचा संघ एकच विकेट घेण्यास अपयशी ठरला. ब्रेकपर्यंत भारताने 3 विकेट्स गमावून 189 रन केले आहेत.