रवि पत्की, क्रिकेट विश्लेषक, मुंबई: भारताच्या 329 धावांना उत्तर देताना इंग्लंडची तारांबळ उडाली. ज्या खेळपट्टीला आवरण उरलेले नाही आणि गुड लेंथ भागात भुगा भुगा झाल्याने चेंडू पडल्यावर जंबो जेट सारखा उडत होता. चेंडू गुड लेंथ वरून अचानक उडवणाऱ्या कुंबळेला जंबो म्हणायचे.तसे आज सगळेच भारतीय स्पिन्नर्स जंबो झाले होते. 
खेळपट्टी कितीही मदत करत असली तरी गोलंदाजीत दिशा आणि टप्पा ह्यावर नियंत्रण नसले तर टर्निंग ट्रॅक वर सुद्धा भरपूर धावा होऊ शकतात.भारतीय स्पिन्नर्सनी उत्तम नियंत्रण दाखवले. अश्विन हा नुसता खेळाडू नाही तर गोलनदाजीचा वेद शास्त्र संपन्न माणूस आहे. तो गोलनदाजीचा प्रचंड विचार करतो.प्रत्येक बॅट्समनचा त्याचा अभ्यास असतो. त्याला अशी खेळपट्टी मिळाल्यावर त्याने त्याचा बराचसा खजिना उघडला. अपवाद होता तो लेग ब्रेकचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेन स्टोक्सला पडलेला चेंडूने अश्विनला जो आनंद दिला असेल त्याची तुलना मोईनला कोहलीची विकेट मिळाल्यानंतर झालेल्या आनंदाशी होऊ शकतो. दोन्ही चेंडूत आधी ड्रीफ्ट आणि मग स्पिनने दिल खुश करून टाकला.


अक्षर पटेलच्या हवेतील चेंडूंच्या वेगाने आणि दिशेने बॅट्समनला पुरते जखडून टाकले आणि रूटची सर्वात महत्वाची स्वस्तात विकेट मिळाली.


आजच्या खेळाने एक महत्वाची गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे स्वीप हा इंग्लंडचा हुकमी शॉट असला तरी खेळपट्टीवर जास्त स्पिन असेल तर त्यांना हा शॉट हात देणार नाही. (भारतीय गोलनदाजी बोथट करायला इंग्लंड ने अनेक वर्षापासून स्वीपचे अस्त्र वापरले आहे).स्वीप शॉट सरसकट वापरता येणार नाही हे त्यांना आज लक्षात आले असेल.


ऋषभ पंत हा थोड्या काळात खूप लोकप्रिय झाला आहे. आज त्याने त्याच्या लौकिकास साजेशी किपिंग न करता दोन स्तिमित करणारे झेल घेतले.ड्रेसिंग रूम मध्ये शास्त्री सकट सगळेच मॅच संपेपर्यंत डोळे चोळत होते असे ऐकतो. यष्टीच्या मागचे पंतचे धावते समालोचन चांगलीच करमणूक करते. 


वेगाने चेंडू टाकणाऱ्या अक्षर पटेलला 'कम ऑन वसीम भाई' म्हणून तो प्रोत्साहन देत होता तर 'खेलेगा आगे,मिल्खासिंग भागे' अशा शीघ्र चरोळ्याही त्याने पेश केल्या.(म्हणजे बॅट्समन फ्रँटफुट वर खेळला तर त्याची पळापळ होणार असा त्याच्या चारोळीचा अर्थ असावा).


ईशान आणि सिराज ने महत्वाच्या क्षणी विकेट्स काढून योगदान दिले.कुलदीप जुन्या चेंडुवर जास्त चांगला ग्रीप करतो म्हणून त्याला कमी षटके मिळाली