अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना अहमदाबाद इथल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे. इंग्लंडचे सर्व गडी 112 धावांवर तंबूत परतले.तिसर्‍या  कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या शेवटपर्यंत पहिल्या डावावर भारताचे वर्चस्व राहिलं आहे. पहिल्याच दिवशी भारताचे 3 गडी बाद झाले असून 99 धावांवर खेळ थांबला. या सामन्यादरम्यान एक आगळी-वेगळी घटना घडली. जे कुणालाही अपेक्षितच नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नरेंद्र मोदी स्टेडियमवर प्रेक्षकांना सामना पाहण्याची परवानगी मिळाली आहे. या सामन्या दरम्यान एक चाहता खूप आनंदीत झाला. उत्साहाच्या भरात भान विसरून चाहता सामना सुरू असलेल्या ठिकाणी गेला. या घटनेमुळे खेळाडूंमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं


WION वेबसाइटनं दिलेल्या वृत्तानुसार भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध फलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. संघातील दोन अनुभवी खेळाडू रोहित शर्मा आणि कर्णधार विराट कोहली जेव्हा क्रीजवर होते तेव्हा एक चाहता थेट मैदानात उतरला. तिथून त्यानं विराटच्या दिशेनं धावण्यास सुरुवात केली. विराटने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याच्यापासून दूर जाण्यासाठी विराटही धावायला लागला.



विराट कोहलीनं दिलेली प्रतिक्रिया आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून हा चाहता मागे फिरला आणि त्यानं पुन्हा आपल्या जागी जाऊन बसण्याचा निर्णय घेतला. तो पळत पुन्हा आपल्या जागेवर गेला. त्याच्या या कृतीमुळे काही मिनिटं खेळात अडथळा आला आणि त्यामुळे पिचवरही गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. 


50 टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये अनुमती
बीसीसीआयने भारत इंग्लंड मालिकेच्या दुसर्‍या कसोटी सामन्यात 50 टक्के प्रेक्षकांना मैदानात प्रवेश करण्याची मुभा दिली होती. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकावेळी 1 लाख 10 हजाराहून अधिक लोक बसू शकतात, त्यानुसार भारत इंग्लंड कसोटी दरम्यान या सामन्यात 55000 पेक्षा जास्त प्रेक्षक असू शकतात.