अहमदाबाद: जगातल्या सर्वात मोठ्या स्टेडियमवर आज भारत विरुद्ध इंग्लड 4 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी मोटेरा स्टेडियमचं नामकरण करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमचे उद्घाटन केले. उद्घाटनासह, मोटेरा स्टेडियमचे नाव बदलण्यात आलं असून आता नरेंद्र मोदी असं नामकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमित शाह या सोहळ्यासाठी खास उपस्थित होते. 





नरेंद्र मोदी स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. अहमदाबादच्या साबरमती येथे असलेले हे स्टेडियम आधुनिक खेळांच्या सुविधांनी सुसज्ज असून भारत-इंग्लंड यांच्यात पहिल्यांदा होणार्‍या पहिल्या डे-नाईट टेस्टचे यजमानपद असेल. हे स्टेडियम 63 एकर क्षेत्रात पसरलेले असून एकाच ठिकाणी 10 लाख प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.


या स्टेडियममध्ये 76 कॉर्पोरेट बॉक्स, ऑलिम्पिक-स्तरीय जलतरण तलाव, इनडोअर अॅकॅडमी, अॅथलिट्ससाठी चार ड्रेसिंग रूम आणि फूड कोर्ट आहेत.


भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा कसोटी सामना आजपासून या मैदानात खेळवला जाणार आहे. पिंक बॉलनं डे-नाइट हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने या मैदानात खेळवले जाणार आहेत.