मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाची मालिकेवरील पकड अधिक मजबूत होत असल्याचं दिसत आहे. तर वॉशिंग्टन सुंदरचं शतक अवघ्या 4 धावांसाठी हुकलं आहे. भारतीय संघाने 365 धावा केल्या आहेत. 160 धावांनी भारतीय संघ पहिल्या डावात आघाडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिला डाव संपला असून पहिल्या डावावर भारतीय संघाची पकड मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे. 110 ओव्हरपर्यंत भारतीय संघानं 7 गडी गमावले असून 349 धावा काढल्या आहेत.


चौथ्या कसोटी सामन्यामध्ये भारतीय संघ 144 धावांनी इंग्लंड संघाच्या पुढे आहे. वॉशिंग्टन सुंदर-अक्षर पटेल मैदानात खेळत आहेत. अहमदाबादमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटीवर आपली भारतीय संघानं आपली पकड आणखी घट्ट केली. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपताच भारताची धावसंख्या 294 धावांत 7 गडी राखून होती. टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतने कारकिर्दीतील तिसरे कसोटी शतक ठोकले.


 ऋषभ पंत चौथ्या कसोटीत पहिल्या डावात  सर्वाधिक धावा करणारा एकमेव खेळाडू ठरला आहे. शुभमन गिल आणि विराट कोहली यांना शून्यावर आऊट होण्याची नामुष्की आली. 
पहिल्या डावात कोणाच्या किती धावा
शुभम गिल- 00
रोहित शर्मा- 49
चेतेश्वर पुजारा-17
विराट कोहली-00
अजिंक्य रहाणे-27
ऋषभ पंत-101
आर अश्विन- 13
अक्षर पटेल-43
वॉशिंग्टन सुंदर 96- नॉटआऊट


भारतानं 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकला तर मालिकेत भारताचा विजय होईल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळू शकेल.