अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड आज निर्णायक लढत होणार आहे. मालिकेत दोन्ही संघांनी 2-2ने आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेचा शेवटचा आणि निर्णायक सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सायंकाळी 7 वाजल्यापासून खेळला जाणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अखेरच्या या महत्त्वपूर्ण सामन्यात दोन खेळाडूंना भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर काढलं जाण्याची शक्यता आहे. तर त्या ऐवजी अक्षर पटेलला पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


वॉशिंग्टन सुंदर
इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या टी 20 मालिकेच्या शेवटच्या सामन्यातून वॉशिंग्टन सुंदरला सुट्टी दिली जाण्याची शक्यता आहे. चौथ्या सामन्यात त्याची कामगिरी विशेष राहिली नाही. त्याच्या जागी राहुल तेवतिया किंवा अक्षर पटेलला संघात संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुल फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये माहीर आहे. त्यामुळे ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याला निवडण्याची शक्यता अधिक आहे.


के एल राहुल
इंग्लंच विरुद्ध निर्णायक सामन्यात के एल राहुलला संघातून बाहेर ठेवलं जाण्याची शक्यता अधिक आहे. आतापर्यंत 4 सामन्यांमध्ये के एल राहुलला विशेष यश मिळालं नाही. त्याने 1,0,0 आणि 15 अशा धावा राहुलनं चार सामन्यांमध्ये केल्या आहेत. त्यामुळे आता त्याला संघातून बाहेर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागी शिखर धवनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. 


शिखर धवन आणि रोहित शर्मा यावेळी ओपनिंग करू शकतील असा कयास आहे. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सीरिज जिंकल्यानंतर आता पुन्हा एकदा टी 20 सामना जिंकण्याची संधी आहे. जर हा सामना भारतीय संघ जिंकला तर टी 20 सामना जिंकण्याची ही सहावी वेळ असणार आहे. आतापर्यंत टीम इंडिया 5 वेळा आंतरराष्ट्रीय टी 20 सीरिज जिंकले आहेत.