ENG vs IND : अखेर ठरलं! कोहली-पंत नाही तर `या` खेळाडूकडे कॅप्टन्सी
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना 1 जुलैपासून खेळवला जात आहे.
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना 1 जुलैपासून खेळवला जात आहे. कोरोनामुळे पाचवा सामना स्थगित करण्यात आला होता. टीम इंडिया 2-1 ने आघाडीवर आहे. आता पाचवा सामना जिंकवण्याची जबाबदारी खास खेळाडूवर सोपवली आहे.
रोहित शर्माला कोरोनाची लागण झाल्याने तो पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर गेला. त्यामुळे आता कर्णधारपदाची जबाबदारी वेगवान बॉलर जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
विराट कोहली आणि ऋषभ पंतला डावलून ही जबाबदारी जसप्रीत बुमराहच्या खांद्यावर देण्यात आली आहे. त्यामुळे बुमराहला आता ही सीरिज जिंकण्याचं आव्हान असणार आहे.
विराट कोहलीला आधी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर आता रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली आहे. टीम इंडियामध्ये जर कोरोनाचा धोका वाढला तर पुन्हा एकदा सामना रखडला जाऊ शकतो. टीम इंडियाला ही सीरिज जिंकण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता बुमराह काय योजना आखणार पाहावं लागणार आहे.