अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. इंग्लंड संघाचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून पहिला फलंदाजीचा निर्णय घेतला. हा फलंदाजीचा निर्णय जो रूटला महागात पडणार असं एकूण सध्याचं चित्र आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय संघाचे गोलंदाज आता इंग्लंडच्या संघावर भारी पडत आहेत. अवघ्या 78 धावांवर 4 खेळाडू बाद करण्यात भारतीय संघाच्या गोलंदाजांना यश आलं आहे. 


30 ओवरच्या अखेरीस इंग्लंडने 78 धावा केल्या आणि त्यांची 4 गडी बाद झाले आहेत. भारताकडून अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी 2-2 विकेट्स घेतल्या आहेत. कर्णधार बेन स्टोक्स 28 आणि ओली पॉप 0 धावा केल्या आहेत. 


 



20 ओवर संपल्यानंतर इंग्लंडने 68 धावा केल्या होत्या तर 3 गडी बाद झाले होते. कर्णधार बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टो 23-23 धावांची भागीदारी केली.


ind vs eng: भारतीय संघातील हे 5 खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर


आर अश्विन आणि अक्षर दोन्ही गोलंदाज आपली दमदार कामगिरी या सामन्यात करतील असा विश्वास आहे. इंग्लंड संघाला तंबूत पाठवण्याचे पुरेपूर प्रयत्न सुरू आहेत. तर भारतीय संघाला या सामन्यावर विजय मिळवण्याचं आव्हान आहे. त्यामुळे ह्या कसोटी सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. भारतानं 4 सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. हा सामना जिंकला तर मालिकेत भारताचा विजय होईल आणि वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये अंतिम सामना खेळण्याची संधी भारतीय संघाला मिळू शकेल.