ind vs eng: भारतीय संघातील हे 5 खेळाडू ठरू शकतात गेम चेंजर

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना आज खेळवला जात आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना डे नाईट खेळवला जाणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष या सामन्याकडे आहे. कारण WTCच्या अंतिम फेरीत कोण जाणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

Mar 04, 2021, 08:36 AM IST
1/5

रोहित शर्मा

रोहित शर्मा

शेवटच्या सामन्यात 5 खेळाडू भारतीय संघासाठी विजय खेचून आणू शकतात. या सामन्यात ते गेम चेंजर ठरू शकतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. रोहित शर्मा ओपनिंग फलंदाज म्हणून मैदनात उतरू शकतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत रोहित शर्मानं चांगली कामगिरी केली. त्यामुळे चौथ्या सामन्यातही त्याची फलंदाजी फॉर्ममध्ये दिसू शकते आणि तो बाजी पलटवू शकतो.

2/5

ऋषभ पंत

ऋषभ पंत

जानेवारीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत ऋषभ पंतनं शानदार कामगिरी केली होती. आता पुन्हा एकदा तो आपल्या फॉर्ममध्ये दिसू शकतो. त्यामुळे चौथ्या सामन्यात त्याने चांगली कामगिरी बजावली तर तो संघासाठी गेम चेंजर ठरेल  

3/5

अक्षर पटेल

अक्षर पटेल

अक्षर पटेल आपल्या तुफान गोलंदाजीनं गेम चेंजर ठरले आहेत. तिसऱ्या कसोटीमध्ये त्याने तब्बल 11 विकेट्स घेत अर्ध्या संघाला तंबूत पाठवलं. त्यामुळे आता चौथ्या कसोटीत देखील सर्वाधिक विकेट्स घेण्यासाठी तो सज्ज झाला आहे. 

4/5

रविचंद्रन अश्विन

रविचंद्रन अश्विन

भारताचा स्पिनर आर अश्विननं तर आपली दमदार कामगिरी पहिल्या सामन्यापासून ठेवली. तिन्ही सामन्यांमध्ये त्याने मैदानात धुमाकूळ घालत इंग्लंडच्या संघाला जेरीस आणलं. चौथ्या सामन्यातही अश्विन 11 बळी घेणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

5/5

विराट कोहली

विराट कोहली

पहिल्या दोन सामन्यांमध्ये विराट कोहलीला विशेष कामगिरी करता आली नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यात विराटनं धावा काढून खातं उघडलं. तर आता चौथ्या कसोटीत उत्तम कामगिरी करण्याची संधी विराटकडे असणार आहे. विराटकडून सर्वांच्या अपेक्षा आहेत.