पुणे : भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या तिसर्‍या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. यासह विराट कोहलीच्या सैन्याने वनडे मालिका २-१ने जिंकली आहे. इंग्लंडचा संघ 50 ओव्हरमध्ये 322 धावा करू शकला. सॅम कुर्रेनने सर्वाधिक 95 धावा केल्या. याशिवाय डेव्हिड मलानने 50, लिम लिव्हिंगस्टोनने 36 आणि बेन स्टोक्सने 35 धावांचे योगदान दिले. लोअर ऑर्डरवर मोईन अलीने 29 धावा केल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार 3 गडी बाद करण्यात यशस्वी झाला. याशिवाय टी नटराजनला 1 विकेट मिळाली.


सॅम कुर्रेन फलंदाजीसाठी क्रीजवर आला तेव्हा इंग्लंडने 168 धावांत 6 गडी गमावले. त्यावेळी असे वाटत होते की टीम इंडिया हा सामना सहज जिंकेल, परंतु सॅमने 83 चेंडूत 95 धावा करत भारताचा सहज विजय रोखला. शेवटपर्यंत तो नाबाद राहिला परंतु इंग्लंडला तो जिंकवू शकला नाही.


प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया 48.2 षटकांत 329 धावा केल्या. शिखर धवन, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या यांच्या अर्धशतकीय खेळीमुळे भारतीय संघाला इतक्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचता आलं.