अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. भारताने 2-1 ने या सीरिजमध्ये आघाडी घेतली आहे. भारत विरुद्ध इंग्लंड चौथा कसोटी सामना होणार आहे. या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघातून बाहेर झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

BCCI ने याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. वैयक्तिक कारणांमुळे जसप्रीत बुमराहने चौथ्या कसोटीमधून वगळण्याची विनंती केली होती. त्या विनंतीला मान देऊन जसप्रीत बुमराहला संघातून बाहेर करण्यात आलं आहे. तिसरा कसोटी सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी मैदानावर पार पडला. या सामन्यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह होता. मात्र आता चौथ्या कसोटीसाठी तो संघात नसेल



बुमराह ऐवजी दुसऱ्या कोणाला आता संघात घेणार नाही. उर्वरित 14 जणांमधून प्लेइंग इलेवनची टीम ठरवण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे.


भारतीय संघात कोण?
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के. एल राहुल, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (विकेटकीपर), वृद्धीमन साहा (विकेटकीपर), आर अश्विन , कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, इशांत शर्मा, मो. सिराज, उमेश यादव