पुणे : इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाज केएल राहुलने शानदार शतक ठोकले. राहुलने 108 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. राहुलच्या वनडे कारकिर्दीतील हे 5 वे शतक आहे, तर इंग्लंडविरुद्धच्या फलंदाजीतील पहिले शतक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शतकी खेळीमुळे केएल राहुल भारताकडून एकदिवसीय सामन्यात 1500 धावा पूर्ण करणारा वेगवान भारतीय फलंदाज ठरला आहे. राहुलने कोहलीला मागे ठाकलं आहे. राहुलने 36 डावांमध्ये 1500 एकदिवसीय धावा पूर्ण केल्या तर कोहलीने 38 डावांमध्ये 1500 धावा केल्या होत्या.


एवढेच नव्हे तर वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या नंबरवर खेळत केएल राहुल शतक झळकावणारा 5 वा भारतीय खेळाडू ठरला आहे. मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड, अजय जडेजा आणि एमएस धोनी यांनी केएल राहुलच्या आधी ही कामगिरी केली आहे.


भारतीय संघाचा स्कोर 50 ओव्हरमध्ये 336/6 इतका आहे. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक 108 रन केले. तर रोहित शर्माने 25, शिखर धवनने 4, विराट कोहलीने 66, ऋषभ पंतने 77, हार्दिक पांड्याने 35 तर कृणाल पांड्याने 12 रन केले.