मुंबई: आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती खूप खास असते. तिच्या असण्याने आपलं पूर्ण आयुष्य बदलून जातं. कधीकधी आपण एकटंच बसून या व्यक्तीला खूप जास्त मिस करतो. टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजाही अशाच एका व्यक्तीला खूप मिस करत आहे. त्याने आपलं हे दु:ख आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर करत भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू रविंद्र जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आहे. 4 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड विरुद्ध 5 सामन्यांच्या सीरिजसाठी तयारी करत आहे. या सामन्यात जडेजा प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार आहे. त्यामुळे जडेजाला खेळताना पाहाणं हे त्याच्या चाहत्यांसाठी आणि क्रिकेटप्रेमींसाठी खूपच खास असणार आहे. 


सध्या रविंद्र जडेजा इंग्लंड दौऱ्यावर आपल्या पत्नीला खूप मिस  करत आहे. जडेजाची पत्नी त्याच्यासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली नाहीय त्यामुळे जडेजा आपल्या बायकोला खूप मिस करत आहे. जेडजा आपल्या बायकोला खूप मिस करतोय हे त्याने फेसबुक आणि इंन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर करून सांगितलं आहे. 



रावी सोलंकीचा फोटो शेअर करत त्याने, 'एक बेचैनी सी होती है अब तो तेरे नाम से. मेजर मिसिंग' असं कॅप्शन दिलं आहे. हा फोटो शेअर करताच चाहत्यांनीही त्यावर कमेंट्स केल्या आहेत. रविंद्र जडेजा रावीला पहिल्यांदाच पाहून तिच्या प्रमात पडला होता.


 


रावीसोबत त्याने 17 एप्रिल 2016मध्ये लग्न केलं. नुकताच त्यांनी आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा केला. इंग्लंड दौऱ्यावर रावी सोबत नसल्यानं जडेजा तिला खूप मिस करत आहे.