मुंबई : टीम इंडियातून विराट कोहली गेल्या अनेक महिन्यांपासून वाईट फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. इंग्लंड विरुद्ध कसोटी असो किंवा टी 20 दोन्हीमध्ये कोहलीची बॅट शांतच दिसली. आयपीएलमध्येही कोहलीला फार चांगली कामगिरी करता आली नाही. त्याच्या सततच्या फ्लॉप शोमुळे आता त्याच्यावर खूप टीका होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीच्या खराब फॉर्ममुळे त्याने संन्यास घ्यावा अशीही चर्चा सोशल मीडियावर होत आहे. तर रोहित शर्मा आणि अनेक दिग्गज क्रिकेटर कोहलीच्या सपोर्टसाठी बोलताना दिसत आहेत. सुनील गावस्कर यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांच्या वक्तव्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. 


विराट कोहलीचा खराब फॉर्म सध्या प्रत्येक भारतीय चाहत्यासाठी चिंतेचा विषय आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटूंनी कोहलीच्या फॉर्मबद्दल चिंता व्यक्त केली. आता या यादीत भारताचे दिग्गज सुनील गावस्करही आहेत. मला कोहलीला फक्त 20 मिनिट भेटायचं आहे. त्याच्याशी मला चर्चा करायची आहे. 


इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर विराट कोहली जवळपास महिनाभराच्या विश्रांतीवर आहे. सुनील गावसकर विराटबद्दल म्हणाले, 'जर मी विराटसोबत 20 मिनिटे बोललो तर मी त्याला काय करायचं ते सांगू शकलो असतो. आताही मला त्याची 20 मिनिटं हवी आहेत. मी 20 मिनिटांत त्याच्याशी चर्चा करून त्याला चांगल्या फॉर्ममध्ये आणू शकेन असा दावा त्यांनी केला आहे. 


इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार्‍या बॉलवर खेळताना खूप नाराज झाल्याचं दिसला. त्याला यामध्ये यश मिळत नव्हतं. सुनील गावसकर म्हणाले की, कोहलीशी 20 मिनिटं बोललो तर तो ऑफ-स्टंपच्या बाहेर बॉल खेळण्याच्या अडचणीवर नक्की मात करू शकतो.