अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेचा तिसरा सामना (Ind vs Eng Third T20) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) आज संध्याकाळी 7 वाजेपासून खेळला जाईल. दोन्ही संघ सध्या मालिकेत १-१ ने बरोबरीत आहेत. टी-२० मालिकेच्या पहिल्या सामन्यात ८ विकेटने पराभवानंतर भारताने दुसर्‍या सामन्यात ७ विकेटने विजय मिळवला होता. पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. आता, भारतीय संघ तिसरा टी-२० सामना जिंकून मालिकेत २-१ ने आघाडी घेण्यासाठी प्रयत्न करेल. इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या टी -२० सामन्यात ४ महत्त्वाचे खेळाडू भारताला विजय मिळवून देण्याची क्षमता ठेवतात. (Ind Vs Eng)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1. विराट कोहली (Virat Kohli)


दुसर्‍या टी -२० सामन्यात विराट कोहलीने ७३ धावांची शानदार खेळी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. कोहलीने ४९ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. तिसर्‍या टी -२० सामन्यातही विराट कोहली आता स्फोटक खेळी करेल अशी चाहत्यांना आशा आहे.


2. रोहित शर्मा (Rohit Sharma)


इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी -२० सामन्यात रोहित शर्मा खेळण्यासाठी सज्ज आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन टी -20 सामन्यात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. तिसर्‍या टी -२० सामन्यात पुनरागमन निश्चित मानले जाते. टी२० क्रिकेटमध्ये हिटमन रोहित शर्माचे ४ शतके आहेत आणि असे करणारा तो जगातील एकमेव फलंदाज आहे.


3. ऋषभ पंत (Rishabh Pant)


ऋषभ पंत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पंतने पहिल्या टी२० सामन्यात २१ तर दुसर्‍या टी२० सामन्यात २६ धावा केल्या. तिसर्‍या टी -२० सामन्यात पंतकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. जर पंत आज शानदार कामगिरी करतो तर भारताला विजयाची पूर्ण खात्री आहे.


4. ईशान किशन (Ishant Kishan)


दुसर्‍या टी -२० सामन्यात सलामीला आलेल्या ईशान किशनने ५६ धावांची शानदार खेळी केली होती. ईशान किशनच्या ३२ चेंडूंच्या तुफानी डावात त्याने ५ चौकार आणि ४ षटकार ठोकले होते. तिसर्‍या टी२० सामन्यातही हा फलंदाज भारतासाठी सामना जिंकवण्याची क्षमता ठेवतो.