IND VS ENG : टीम इंडियाच्या पराभवानंतर क्रिकेट फॅन्सना आली MS Dhoni ची आठवण, जाणून घ्या कारण
`एक था जो स्टंप के पिछे से मॅच पलट देता था...!`, धोनीचे फोटो पोस्ट करून फॅन्स काढतायत आठवण
पर्थ : टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल (Semi final) सामन्यात टीम इंडियाचा (Team India) दारूण पराभव झाला आहे. इंग्लंडने 4 ओव्हर आणि 10 विकेट्स राखून टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला आहे. या पराभवानंतर करोडो भारतीय फॅन्सची (Cricket fans) निराशा झाली आहे. तसेच अनेक भारतीय फॅन्स सोशल मीडियावर संतंप्त प्रतिक्रिया देत आहेत. त्यात काही फॅन्स टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) आठवण काढत आहेत. दरम्यान हे भारतीय फॅन्स धोनीची आठवण का काढत आहेत, हे जाणून घेऊयात.
सेमी फायनलमधील टीम इंडियाच्या (Team India) पराभवानंतर करोडो फॅन्सची निराशा झाली आहे. त्यामुळे अनेक फॅन्स सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत. टीम इंडियाच्या खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोल देखील केले जात आहे. तसेच अनेक फॅन्स मीम्स पोस्ट करून टीम इंडियाच्या खेळाडूंची टींगल देखील उडवत आहेत.
धोनीचे फोटो का होतायत पोस्ट?
या सर्वांत क्रिकेट फॅनचा एक असाही वर्ग आहे, जो महेंद्र सिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) आठवण काढत आहे. महेंद्र सिंह धोनीने टीम इंडियासाठी (Team India) दिलेल्या योगदानाची आठवण करून देणारे फोटो आणि मेसेजेस पोस्ट करत आहेत. तसेच अनेक फॅन्सचे असे देखील म्हणणे आहे की, महेंद्र सिंह धोनीचा क्रिकेट कार्यकाळ सर्वांत चांगला कार्यकाळ होता. क्रिकेट फॅन्स अशाप्रकारच्या पोस्ट टाकून धोनीची आठवण काढत आहे.
धोनीच योगदान काय?
टीम इंडियासाठी महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) खुप मोठ योगदान दिले आहे. त्याने भारतासाठी अनेक बड्या स्पर्धा जिंकल्या आहेत. 2007 चा टी20 वर्ल्ड कप, 2011 चा ओडीआय वर्ल्ड कप आणि 2013 सालची आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी धोनीने भारताला जिंकवून दिली आहे. अशी कामगिरी अनके कर्णधारांना करता आली नाहीए.
महेंद्रसिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आपल्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसीच्या तिन्ही स्पर्धेचं (T20I, ODI AND CHAMPIONS TROPHY) विजेतेपद मिळवून दिलं होतं. मात्र त्यानंतर धोनीने निवृत्ती घेतल्यानंतर असा करीश्मा कोणत्याच कर्णधाराला करता आला नाही.
कसा रंगला सामना
टी20 वर्ल्ड कपमधील (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात इंग्लंडने (England) टॉस जिंकत फिल्डींगचा निर्णय घेतला होता. त्यामुळे टीम इंडिया (Team India) प्रथम फलंदाजीस उतरली होती. टीम इंडियाने विराट कोहली (virat kohli) आणि हार्दिक पंड्याच्या तुफान खेळीच्या बळावर 6 विकेट गमावून 168 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे इंग्लंडसमोर विजयासाठी 169 धावांचे लक्ष्य होते. हे लक्ष्य इग्लंडने 4 ओव्हर पुर्वीच पुर्ण करत 10 विकेटसने टीम इंडियाचा लाजीरवाणा पराभव केला.
दरम्यान टीम इंडियाचा (Team India) पराभव करून इंग्लंड आता फायनलमध्ये धडकली आहे. फायनलमध्ये आता पाकिस्तान विरूद्ध इंग्लंड असा सामना रंगणार आहे. या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता लागली आहे.