India vs England, World Cup 2023  : लखनऊच्या भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्ड कपचा 29 वा सामना खेळवला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि टीम इंडियाला फलंदाजीचं आमंत्रण दिलं. इंग्लंडचा संघ जवळजवळ वर्ल्ड कपमधून बाहेर पडलाय पण टीम इंडियासाठी हा महत्त्वाचा सामना असणार आहे. अशातच सामना सुरू होण्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात उतरल्याचं दिसले. भारतीय खेळाडूंनी काळ्या पट्ट्या का बांधल्या? याचं कारण नेमकं काय? असा सवाल विचारला जातोय. त्याचं उत्तर आता बीसीसीआयने दिलंय.


बीसीसीआयने सांगितलं कारण!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळ सुरू होण्यापूर्वी दिग्गज बिशन सिंग बेदी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ टीम इंडिया ब्लॅक आर्मबँड घालणार आहे, असं बीसीसीआयने पोस्ट करत स्पष्ट केलं होतं.



टीम इंडियाचे सलामीवीर शुबमन गिल (Shubman Gill) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) मैदानात उतरले होते. यावेळी भारताला डावाच्या चौथ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पहिला धक्का बसला. शुभमन गिलने 13 चेंडूमध्ये 9 धावा करत बाद झाला. तर ज्याच्या फलंदाजीची सर्वजण वाट पाहत होते, असा विराट कोहली शुन्यावर बाद झाला. 


टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.  


इंग्लंड : जॉनी बेअरस्टो, डेविड मालन, जो रूट, बेन स्टोक्स, जॉस बटलर (C), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वुड.