अहमदाबाद : भारताने इंग्लंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताकडून दुसऱ्या इनिंगमध्ये रोहित शर्माने 25 आणि शुभमन गिलने 15 रन केले. भारताने १० विकटने तिसरा सामना जिंकत २-१ ने आघाडी घेतली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना २ दिवसात संपला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसर्‍या डावात भारताला विजयासाठी 49 धावांची गरज होती. भारताने फक्त 7.4 ओव्हरमध्ये ते पूर्ण केले. रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियाला विजय मिळवून दिला.


अक्षर पटेल विजयाचा नायक


भारतीय फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने पहिल्या डावात 38 धावा देऊन 6 विकेट घेत इंग्लंडला  घाम फोडला. त्याच्या कसोटी कारकिर्दीतील ही सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे. दुसर्‍या डावात त्याने 32 धावा देत 5 विकेट घेतले. अशा प्रकारे त्याने या सामन्यात 11 विकेट घेतले.


अश्विनची दमदार कामगिरी


रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात 26 धावा देऊन 3 विकेट घेतले. तर दुसऱ्या डावात 48 धावा देऊन 4 विकेट घेतले. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील 400 विकेटही पूर्ण केले. असे करणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.


पहिल्या डावात इंग्लंडने नाणेफेक जिंकून ११२ धावा केल्या. ज्यामध्ये जॅक क्रॉलीने सर्वाधिक 53 धावा केल्या. दुसऱ्या डावात संपूर्ण टीम 81 धावांवर बाद झाली. पहिल्या डावातही टीम इंडिया काही खास कामगिरी करण्यात अपयशी ठरली, यजमानांनी इंग्लंडविरुद्ध 33 धावांची आघाडी घेतली. केवळ रोहित शर्माने मोठा डाव खेळला आणि शानदार 66 धावा केल्या. दुसर्‍या डावात भारताला विजयासाठी फार कष्ट घ्यावे लागले नाहीत.


भारत आणि इंग्लंड यांच्यातील मालिकेची चौथी आणि शेवटची कसोटी मालिका 4 मार्चपासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळली जाईल. आयसीसी कसोटी चँपियनशिपच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्यासाठी टीम इंडियाला हा सामना जिंकवा किंवा ड्रॉ करावा लागेल.