अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर अहमदाबाद इथे हा सामना सुरू आहे. भारतीय संघ फलंदाजी करत आहे. कर्णधार विराट कोहलीचं या सामन्यात पुन्हा एकदा बॅड लक पाहायला मिळालं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीला एकही धावा काढता आली नाही. मैदानात येताच त्याला पुन्हा माघारी जावं लागलं. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर तंबूत परतला आहे. विराटला बेन स्टोक्सने बाद केलं.


विराट कोहलीनं आणखीन एक अजब विक्रम आपल्या नावावर करून घेतला आहे. या मालिकेमध्ये शून्यवर बाद होण्याची विराटची दुसरी वेळ आहे. कसोटी सामन्यांमध्ये शून्यवर बाद होणाऱ्यांच्या यादीमध्ये आता विराट कोहली सर्वात पहिल्या स्थानावर आहे. हा लाजीरवाणा रेकॉर्ड त्याच्या नावावर लागला आहे. 



या आधी महेंद्रसिंह धोनीचं नाव अग्रस्थानी होतं. मात्र आता विराट पहिल्या स्थानावर आहे. विराट कसोटी सामन्यात आठव्यांदा शून्यवर बाद झाला आहे. या यादीमध्ये आता विराटने धोनीची बरोबरी केली आहे. 


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शून्यवर आऊट होण्याचा विक्रम भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी केला होता. 13 वेगवेगळ्या सामन्यांमध्ये त्यांच्यावर शून्यवर बाद होण्याची नामुष्की ओढवली होती. त्यानंतर 11 वेळा माहीवरही ही परिस्थिती ओढवली आणि आता विराट कोहलीही या यादीत आला आहे.