IND vs ENG : टीम इंडियाला `जोर का झटका`, Virat Kohli संघातून बाहेर, पाहा नेमकं कारण काय?
India vs England Test Series : टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे.
IND vs ENG, Virat Kohli : आयपीएल 2024 पूर्वी टीम इंडिया इंग्लंडविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका (IND vs ENG Test series) खेळणार आहे. या टेस्ट सीरीजमधील पहिला सामना हैदराबादमधील (Hyderabad) राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये (Rajiv Gandhi International Cricket Stadium) खेळवला जाणार जाईल. सामना तोंडवर आला असताना आता टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली (Virat Kohli) संघातून बाहेर गेल्याचं वृत्त बीसीसीआयने दिलं आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचं टेन्शन वाढलंय.
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात खेळणार नाही, अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. विराट कोहलीने खासगी कारणास्तव सुट्टी घेतल्याची माहिती बीसीसीआयकडून देण्यात आलीये. विराटने बोर्डाकडे सुट्टीची विनंती केल्यानंतर त्याची विनंती मान्य करण्यात आली आहे. विराट कोहलीने रोहित शर्मा, टीम मॅनेजमेंट आणि सिलेक्टर्सशी बोलणं केलं आहे. देशाचे प्रतिनिधित्व करणं हे नेहमीच त्याचे सर्वोच्च प्राधान्य असतं, काही वैयक्तिक परिस्थितीमुळे काही निर्णय घ्यावे लागतात, असं बीसीसीयआने म्हटलं आहे.
विराट संघात नसेल तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार? यावर सर्वांच लक्ष लागलंय. बीसीसीआय अद्याप बदली खेळाडूचं नाव जाहीर केलं नाही. त्यामुळे आता विराटसारखा तगडा खेळाडू नसेल तर कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अजिंक्य रहाणे कमबॅक करणार?
रणजी ट्रॉफीमध्ये रहाणे सलग दोन सामन्यांत खातं न उघडता बाद झाला आहे. रहाणे आधी आंध्र प्रदेशविरुद्ध पहिल्या चेंडूवर खातं न उघडता बाद झाला आणि त्यानंतर केरळविरुद्धही तो पहिल्या चेंडूवर शून्य धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यामुळे आता रोहित शर्मा पुन्हा अजिंक्य रहाणेवर विश्वास दाखवणार का? असा सवाल विचारला जातोय.
पहिल्या 2 सामन्यासाठी टीम इंडिया -
रोहित शर्मा (कॅप्टन), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.