IND VS ENG : पिचवर टीका करणाऱ्यांना विराट कोहलीचं जोरदार उत्तर
विराट कोहलीने टीकाकारांचं तोंड केलं बंद
मुंबई : भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तीन सामने पार पडले आहेत. तर भारताने तिसऱ्या सामन्यात 10 गडी बाद करुन दणदणीत विजय मिळवला आहे. मालिकेत भारताने 2-1ने आघाडी घेतली आहे. चौथा सामना हा जगातील सर्वात मोठ्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तिसरा सामना दोन दिवसात संपला होता. काही खेळाडूंनी यामुळे पिचवर टीका केली होती. इंडिया टीमचा कर्णधार विराट कोहलीने पिचवर टीका करणाऱ्यांना चांगलंच उत्तर दिलं आहे.
कोहलीकडून टीकाकारांवर हल्ला
कसोटीच्या चौथ्या सामन्या अगोदर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने पिचवर टीका करणाऱ्यावर हल्ला केला आहे. विराटने चौथ्या मालिकेअगोदर पत्रकार परिषदेत म्हटलं की, नरेंद्र मोदी स्टेडियम पिचवर खूप दिवसांपासून टीका होत आहे. पिचवर स्पिनवरुन वाद निर्माण झाला आहे. ज्यामध्ये आपल्या मीडियाने सर्वाना उत्तर दिले पाहिजे की, भारताच्या उपखंडात याच प्रकाराची पिच असतात. एका फलंदाजापुढे फक्त स्कोर बनवणे आणि आपल्या टीमला जिंकवणे हाच फोकस असला पाहि़जे.
विराटने म्हटले की, खेळाडूने स्टेडियमच्या पिचवर नाही तर आपल्या तंत्रावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. एक टेस्ट मॅच सलग ४-५ दिवस चाले तेव्हा कुणाला अडचण नाही. मात्र टेस्ट दोन दिवसात संपन्न झाली तर सर्वाना त्रास होतोय.
कर्णधार विराट कोहलीने एका उल्लेखात म्हटले की, 'भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये ३६ ओव्हर खेळून तिसऱ्या दिवशी भारताचा पराभव झाला होता. तेव्हा आमच्याकडून कोणत्याही प्रकाराची टीका आणि तक्रार करण्यात आली नव्हती.'
टीम इंडियाचे फलंदाज न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजासमोर अयशस्वी ठरले होते. यावेळी भारताचा ०-२ ने पराभव झाला होता.