सिडनी : टीम इंडियाचा (Team India) तोडफोड फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) आपल्या रनमशीन का म्हणतात, हे पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवलंय. विराटने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup 2022) नेदरलँड विरुद्धच्या सामन्यात (IND vs NL) मोठा कारनामा केलाय. विराटने नेदरलँड विरुद्ध 44 बॉलमध्ये 3 फोर आणि 2 सिक्सच्या मदतीने 62 रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली. विराटने यासह मोठा रेकॉर्ड ब्रेक केलाय. विराट या खेळीमुळे पहिला भारतीय आणि क्रिकेट विश्वातील दुसराच फलंदाज ठरलाय. (ind vs ned live Virat kohli becomes the second highest run scorer in the T20 world cup after breaking Chris Gayle's record)


विराटने नक्की काय केलं? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराटने टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा (Most Runs In T 20 World Cup) करण्याबाबत विंडिजचा माजी आक्रमक सलामीवीर ख्रिस गेलचा (Chris Gayle) रेकॉर्ड ब्रेक केलाय. विराट यासह टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा आणि पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.


टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेच्या (Mahela Jaywardene) नावावर आहे. जयवर्धनने 1 हजार 16 धावा केल्या आहेत जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे. त्यानंतर विराट 989 धावांसह गेलला पछाडत दुसऱ्या क्रमाकांवर विराजमान झालाय. तसेच विराटने मागे टाकल्याने गेलची तिसऱ्या क्रमांकावर 965 धावांसह पिछेहाट झालीय. 


टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज 


1. महेला जयवर्धने (श्रीलंका) - 1016 रन


2. विराट कोहली (भारत) - 989 रन


3. क्रिस गेल (वेस्टइंडीज) - 965 रन