IND vs NED T20 World Cup : सुर्यकुमार यादवचा भीम पराक्रम! `या` मोठ्या विक्रमावर कोरलं नाव
जे रोहित, विराटला गेल्या 10 वर्षात जमलं नाही ते सुर्यकुमार यादवने दीड वर्षात करून दाखवलं,असा विक्रम करणारा ठरला पहिलाच बॅटसमन
पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) आज टीम इंडियाने (Team India) 56 धावांनी नेदरलँड्सचा पराभव करत विजयी घौडदौड कायम ठेवली. टीम इंडियाच्या विजयात बॅट्समन सह बॉलर्सच उत्कृष्ट योगदान होते. याच सामन्यात टीम इंडियाचा बॅट्समन सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. हा विक्रम नेमका काय आहे हे जाणून घेऊयात.
नेदरलँड्स विरूद्ध तुफानी खेळी
नेदरलँड्स (Netherland) विरूद्धच्या सामन्यात सुर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) 51 धावांची तुफानी खेळी केली. सुर्यकुमारने 25 बॉलमध्ये 51 धावा केल्या. या त्याच्या खेळीत त्याने 7 फोर आणि 1 सिक्स मारला आहे. मैदानावर एक वेळ अशी होती, ज्यावेळेस टीम इंडिया (Team India) 160 चाही आकडा गाठेल कि नाही अशी शंका होती. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये गिअर बदलत विराट आणि सुर्यकुमारने 179 पर्यंत धावसंख्या नेली.
टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, नेदरलँडचा इतक्या धावांनी पराभव
रेकॉर्ड काय?
नेदरलँड्सविरुद्धच्या (Netherland) सामन्यात सूर्यकुमारने (Suryakumar Yadav)अर्धशतक झळकावले होते. सूर्यकुमारने 200 च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या. या खेळीसोबतच त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. एकाच वर्षात T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 200 च्या स्ट्राइक रेटने पाच वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा सूर्यकुमार पहिला फलंदाज ठरला आहे.
सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) यावर्षी वेस्ट इंडिजविरुद्ध 31 चेंडूंत 65, इंग्लंडविरुद्ध 55 चेंडूंत 117, हाँगकाँगविरुद्ध 26 चेंडूंत नाबाद 68, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 22 चेंडूंत 61 आणि नेदरलँडविरुद्ध 25 चेंडूंत नाबाद 51 धावा केल्या आहेत. या त्याच्या सर्व खेळी 200 च्या स्ट्राइक रेटने आलेल्या आहेत.
विराट-रोहितलाही जमलं नाही
रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंना देखील असा विक्रम त्याच्या कारकिर्दीत करता आला नाही आहे, तो विक्रम सूर्यकुमारने केला आहे. विशेष म्हणजे पदार्पणाच्या अवघ्या दीडच वर्षात त्याने ही किमया करून दाखवली आहे.
सर्वाधिक धावा
सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करणारा देखील फलंदाज बनला आहे. त्याने यावर्षी 25 सामन्यात 41.28 च्या सरासरीने 867 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 184.86 इतका राहिला आहे. सूर्याने यावर्षी 1 शतक आणि 7 अर्धशतके झळकावली आहेत.सुर्यकुमारने (Suryakumar Yadav) यावर्षी 52 सिक्स मारले असून 50 किंवा त्याहून अधिक सिक्स मारणारा तो एकमेव फलंदाज आहे.
सूर्यकुमार (Suryakumar Yadav) नंतर पाकिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रिझवानने यावर्षी 19 सामन्यांत 51.56 च्या सरासरीने 825 धावा केल्या आहेत. या वर्षात आतापर्यंत रिझवानच्या बॅटमधून 9 अर्धशतके झाली आहेत. रिझवानने 124.62 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या आहेत.
दरम्यान सुर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याच्या या फॉर्मचा टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) खुप फायदा होणार आहे.