IND vs NED T20 World Cup : टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, नेदरलँडचा इतक्या धावांनी पराभव

नेदरलँडचा पराभव करत टीम इंडियाने पॉईंट टेबल्समध्ये घेतली मोठी झेप

Updated: Oct 27, 2022, 04:28 PM IST
IND vs NED T20 World Cup : टीम इंडियाची भेदक गोलंदाजी, नेदरलँडचा इतक्या धावांनी पराभव title=

पर्थ : IND vs NED T20 World Cup टी20 वर्ल्ड कपमधील दुसरा टी20 सामना टीम इंडियाने (Team India) जिंकला आहे.नेदरलँडचा (Netherland) 56 धावांनी पराभव करत टीम इंडियाने (Team India) हा दुसऱा सामना जिंकला आहे. हा सामना जिंकत 4 गुणांसह टीम इंडिया पॉईंटस् टेबलमध्ये टॉपवर पोहोचली आहे.

टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 180 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या नेदरलँडची (Netherland) सुरुवात चांगली झाली नव्हती. टीम इंडियाच्या (Team India) भेदक गोलंदाजी समोर नेदरलँडचे बॅटसमन जास्त काळ क्रिझवर टिकू शकले नाही. आणि एका मागून एक विकेट पडायला सुरुवात झाली. नेदरलँडच्या एकाही बॅटसमनला 20 ही धावसंख्या देखील गाठता आली नाही. 

टीम इंडियाकडून  (Team India)अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विनने 2-2 विकेट घेतले, तर भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग यांनीही 2-2 विकेट घेतल्या. अखेरीस  नेदरलँड्सला 9 गडी गमावून 123 धावाच करता आल्या. त्यामुळे टीम इंडियाने 56 धावांनी नेदरलँड्सचा पराभव केला. टीम इंडियाचा फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाजांनी विजयात मोलाची भूमिका बजावली. 

दरम्यान टीम इंडियाने (Team India) प्रथम बॅटींग करत 2 विकेट गमावून 179 धावा केल्या होत्या. विराटच्या 62, रोहितच्या 53 आणि सुर्यकुमार यादवच्या 51 धावांच्या बळावर टीम इंडियाने ही धावसंख्या उभारली होती. 

हा सामना जिंकत टीम इंडियाने (Team India)आता सुपर 12 मधला दुसरा सामना जिंकला आहे. या विजयासह टीम इंडिया पॉईंटस् टेबलमध्ये 4 गुणांसह टॉपवर पोहोचली आहे.