Video : रोहित शर्माचं बॅड लक! विचारही केला नसेल अशी विकेट पडली, रडवेल्या चेहऱ्यानं मैदानाबाहेर पडला
IND VS NZ 1st Test Rohit Sharma Dismissal : पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने दमदार अर्धशतक ठोकले.
IND VS NZ 1st Test : भारत विरुद्ध बांगलादेश (India VS New Zealand) यांच्यात तीन सामान्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून शुक्रवारी बंगळुरूमध्ये पहिल्या टेस्ट सामन्याचा तिसरा दिवस पार पडत आहे. तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी दमदार खेळी करून 402 धावा केल्या आणि 356 धावांची आघाडी घेतली. पहिल्या इनिंगमध्ये 46 वर ऑल आउट झालेली टीम इंडिया धावांचा डोंगर कसा पार करेल अशी शंका सर्वांना होती मात्र कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) दमदार अर्धशतक ठोकले. पण टी ब्रेकनंतर सामन्याने कलाटणी घेतली आणि कोण विचारही केला नसेल अशा पद्धतीने भारताच्या कर्णधाराची विकेट पडली.
नेमकं काय घडलं?
न्यूझीलंडने उभी केलेली धावांची मोठी आघाडी मोडण्यासाठी टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्मा हे सलामी फलंदाज मैदानात आले. यावेळी दोघांनी मैदानात टिकून राहत 72 धावांची पार्टनरशिप केली. यात रोहित शर्माने 52 धावा करून अर्धशतक ठोकले तर यशस्वीने देखील 35 धावा केल्या. टी ब्रेकनंतर भारताचा डाव काहीसा गंडला. 18 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर एजाज पटेलने यशस्वीची विकेट घेतली. त्यानंतर 22 व्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर रोहित शर्माची विकेट गेली.
हेही वाचा : IND vs NZ: बंगळुरू टेस्टमध्ये टीम इंडियावर भारी पडला 'भारतीय', शतक ठोकून रचला धावांचा डोंगर
एजाज पटेल 22 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. तेव्हा रोहित शर्मा चांगल्या फॉर्मात होता, त्याने 8 चौकार आणि 1 षटकार सुद्धा लगावले होता. परंतु एजाज पटेलने 22 व्या ओव्हरमध्ये टाकलेला पाचवा बॉल रोहितने समोर प्लेट केला. पण तो बॉल अलगद स्टंप्सवर जाऊन आदळला. त्यामुळे रोहित बोल्ड आउट झाला. समोर प्लेट केलेला बॉल अशा प्रकारे स्टंप्सवर जाईल याचा कोणी विचार सुद्धा केला नव्हता. रोहित शर्मा सुद्धा हे पाहून शॉक झाला आणि त्याने डोक्यालाच हात लावला. चांगल्या लयीत असताना अशी विकेट पडल्याने मैदानाबाहेर जाताना रोहितचा चेहरा रडवेला झाला होता. रोहित शर्माची विकेट गेली तेव्हा भारताची धावसंख्या 95 धावांवर 2 अशी होती.
पाहा व्हिडीओ :
भारताची प्लेईंग 11 :
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
न्यूझीलंडची प्लेईंग 11 :
टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टिम साउथी, एजाझ पटेल, विल्यम ओरूरके