मुंबईकर श्रेयसची पदार्पणातच न्यूझीलंड विरुद्ध ऐतिहासिक कामगिरी, ठरला पहिलाच भारतीय
मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) पदार्पणातील सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध (IND vs NZ 1st Test) ऐतिहासिक कामगरी केली आहे.
कानपूर : न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs New Zealand 1st test) मुंबईकर श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) कसोटी पदार्पण केलं. त्याने या पदार्पणातील सामन्यातच रेकॉर्ड केलाय. श्रेयस असा विक्रम करणारा भारतीय क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरला आहे. श्रेयसने पहिल्या डावात शतक ठोकलं. तर दुसऱ्या डावात 65 धावांची खेळी केली. यासह त्याने ऐतिहासिक कामगरी केली आहे. श्रेयस टीम इंडियाकडून एकाच सामन्यात शतक आणि अर्धशतक लगावणारा पहिला भारतीय ठरला आहे. (ind vs nz 1st test shreyas iyer become 1st indian batsman who scored hundred and half century in match in test debut at green park kanpur)
श्रेयसने दुसऱ्या डावात एकूण 109 चेंडूत 5 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केलं. यासह श्रेयस एकाच सामनन्यात असा जोरदार धमाका केला. श्रेयसने दोन्ही डावात टीम इंडिया अडचणीत असताना निर्णायक क्षणी डाव सावरला.
श्रेयस जेव्हा पहिल्या डावात बॅटिंगसाठी आला तेव्हा टीम इंडियाची 3 बाद 106 अशी स्थिती होती. तर दुसऱ्या डावात 3 बाद 41 धावा असताना श्रेयस मैदानात आला. कसोटी सामन्यात विशेष करुन पदार्पणात शतक आणि अर्धशतक करणं ही मोठी गोष्ट आहे. श्रेयसने त्याला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. तसंच निर्णायक क्षणी सामना आपल्या बाजूने पालटण्याची क्षमता असल्याचंही श्रेयसने दाखवून दिलं.
दोन्ही डावात पदार्पणात अर्धशतक करणारे भारतीय
टीम इंडियाकडून आतापर्यंत 2 फलंदाजांनी पदार्पणातील सामन्यातील दोन्ही डावात अर्धशतक लगावलं होतं, मात्र शतक लगावण्यात या दोघांनाही यश आलं नाही. यामध्ये दिलावर हुसेन (Dilawar Hussain) आणि सुनील गावसकर (Sunil Gavskar) यांचा समावेश आहे.
दिलावर यांनी 1933-34 मध्ये इंग्लंड विरुद्ध कोलकातात पहिल्या आणि दुसऱ्या डावात अनुक्रमे 59 आणि 57 धावा केल्या होत्या. तर गावसकरांनी 1970-71 मध्ये पोर्ट ऑफ स्पेनमध्ये वेस्टइंडिज विरुद्ध अनुक्रमे 65 आणि नाबाद 67 धावा केल्या होत्या.
टीम इंडियाकडे 250+ धावांची आघाडी
टीम इंडियाने पहिल्या डावात 345 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला पहिल्या डावात 296 धावाच करता आल्या. यामुळे टीम इंडियाला 49 धावांची कमी पण महत्त्वाची आघाडी मिळाली. दरम्यान टीम इंडियाने 250 पेक्षा अधिक धावांची आघाडी घेतली आहे.