IND Vs NZ: टीम इंडिया आपल्याच जाळ्यात कशी अडकली? मालिका पराभवाची कारणे जाणून घ्या
IND VS NZ Pune Test: तब्ब्ल 12 वर्षांनंतर मायदेशात टीम इंडियाने कसोटी मालिका गमावली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झालेल्या टीम इंडियाच्या पराभवाची कारणे समोर आली आहेत.
IND vs NZ 2nd Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना पुण्यात २६ ऑक्टोबर खेळला गेला. पहिल्याच दिवशी न्यूझीलंड टीमने शानदार खेळी केली होती. या सामन्यात टीम इंडियाला मायदेशातच लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड टीमने टीम इंडियाचा 113 धावांनी पराभव करत मालिका 2-0 अशी जिंकली आहे. खूप प्रयत्न करूनही रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने मालिका गमावली आहे. टीम इंडियाने जवळपास 12 वर्षांनंतर मायदेशात कसोटी मालिका गमावली आहे, हा भारतासाठी अतिशय लाजिरवाणा पराभव आहे. टीम इंडियाच्या पराभवाची 5 कारणे काय होती ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात.
> खराब प्लेइंग इलेव्हनची निवड
रोहित शर्माने दुसऱ्या कसोटीत तीन खेळाडूंना काढून तीन फिरकीपटूंना संधी दिली होती. रोहितने चार फिरकी गोलंदाज घेणे आवश्यक होते. कारण पुण्याची खेळपट्टी ही फिरकीला अनुकूल खेळपट्टी होती. अशा स्थितीत प्लेइंग इलेव्हनच्या निवडीतही रोहितने चूक केली.
> रोहित शर्माचे खराब कर्णधारपद
पुणे कसोटी मालिकेत रोहित शर्माने आतापर्यंत अत्यंत खराब कर्णधारपद भूषवले आहे. रोहितचा खेळाडूंवर विश्वास नाही असे या मालिकेतून दिसून येते. सरफराज खानने पहिल्या सामन्यात 150 धावांची खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या कसोटीत रोहितने त्यांची बॅटिंग पोझिशन बदलली.
> फ्लॉप झाली टॉप ऑर्डर
टीम इंडियाची टॉप ऑर्डर सफ्लॉप ठरली. असे मानले जाते की हे टीम इंडियाच्या पराभवाचे प्रमुख कारण होते. जैस्वाल सोडता रोहित, विराट आणि गिल हे तिघेही सपशेल फ्लॉप ठरले.
> फिरकीपटूंविरुद्ध खराब कामगिरी
न्यूझीलंड टीमच्या फिरकीपटूंविरुद्ध भारतीय फलंदाजांनी अत्यंत खराब कामगिरी केली आहे. रोहित, विराट कोहली आणि गिल या तिघांची विकेट फिरकीपटूंनी घेतली. न्यूझीलंड टीमच्या गोलंदाज मिचेल सँटनरने दुसऱ्या कसोटीत पहिल्या डावात 7 आणि दुसऱ्या डावात 6 विकेट्स घेतल्या.
> फलंदाज आणि गोलंदाज दोघांचीही खराब कामगिरी
रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडून खूप अपेक्षा होत्या पण त्यांनी खराब कामगिरी केली. हेही पराभवाचे प्रमुख कारण ठरले आहे. गोलंदाजांबद्दल बोलायचे तर, अश्विन असो की जडेजा आणि बुमराह, सर्वांनी अतिशय खराब कामगिरी केली आणि न्यूझीलंड टीमच्या झटपट बाद करण्यात त्यांना यश आले नाही.