IND vs NZ 2nd Test | वादग्रस्तरित्या बाद, त्यानंतरही आक्रमक विराट हसत होता, का ते वाचा
तापट, आक्रमक आणि उत्साही ही विशेषणं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी लागू होतात.
मुंबई : तापट, आक्रमक आणि उत्साही ही विशेषणं टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसाठी लागू होतात. विराट मैदानात नेहमीच आक्रमक रुपात पाहायला मिळतो. विराटचा स्वत:च्या रागावर संयम ठेवता येत नाही. विराट क्वचित वेळेस शांत असलेला दिसून येतो. न्यूझीलंड विरुद्धच्या मुंबईत सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटीत विराटचा असाच काहीसा अवतार पाहायला मिळाला. क्रिकेट चाहत्यांना वेगळ्याच विराटचं रुप पाहायला मिळालं. (ind vs nz 2nd test team india vs New Zealand virat kohli controversial dismissal at wankhede stadium)
नक्की काय झालं?
विराटला सामन्याच्या पहिला दिवशी वादग्रस्तरित्या बाद देण्यात आलं. विराटने एजाजच्या बॉलिंगवर पुढे येत बचावात्मक पद्धतीने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान अंपायर अनिल चौधरीने विराटला आऊट दिलं. विराटने या निर्णयाला आव्हान देत रिविव्हयू घेतला.
थर्ड अंपायरला पण अचूक निर्णय देता आला नाही. थर्ड अंपायरनुसार, एकाच वेळी बॅट आणि पॅडला बॉल लागला. त्यामुळे थर्ड अंपायरनेही फिल्ड अंपायरचा निर्णय कायम ठेवला. अखेर विराटला निर्णय मान्य करावा लागला.
विराट नाराज
या निर्णयामुळे निराश झालेला दिसून आला. विराटने थर्ड अंपायरच्या निर्णायनंतर फिल्ड अंपायरसह पुन्हा चर्चा केली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. अखेर विराट निराश होवून ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला.
विराट ड्रेसिंग मैदानाबाहेर जाण्यापर्यंत शांत होता. शांत असलेल्या विराटने अखेर सीमारेषेवर आपला राग काढला. विराटने बाऊंड्री लाईनवर बॅट मारत आपला राग काढला.
आणि रागावलेला विराट नंतर...
आऊट झाल्यानंतर विराट ड्रेसिंग रुमच्या बालकनीत उभा होता. तेव्हा विराट फार निराश दिसत होता. विराट डोक्यावर हात ठेवून विचारमग्न दिसत होता. त्यानंतर त्याने नकारात्मक मान हलवली. यानंतर तो हसू लागला. कदाचित ड्रेसिंग रुममधील वातावरणामुळे विराट हा बदल झाला असावा.