3rd ODI IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मंगळवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium) खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने जिंकून सध्या मालिकेत विजयी आघाडी मिळवली आहे. त्यामुळे भारताने सिरीजमध्ये 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतलीये. त्यातच आता टीम इंडिया न्यूझीलंडला (IND vs NZ 3rd ODI) क्लीन स्वीप करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्याच्या तयारीत आहे. ही सिरीज जिंकल्यानंतर टीम आयसीसी वनडे टीम रँकिंगमध्ये नंबर 1 क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता आहे. (IND vs NZ 3rd ODI Kiwis no tension despite series loss Daryl Mitchell shocking statement marathi sports news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडचा संघ या मालिकेत न्यूझीलंडचा संघ अनेक वरिष्ठ खेळाडूंशिवाय खेळत आहे. त्यामुळे याचा फटका सहन करावा लागतोय. स्टार केन विल्यमसन (Kane Williamson) आणि इतर वरिष्ठ खेळाडूंची उणीव भासत असली तरी, अनेक युवा खेळाडूंनी या मालिकेत कमाल दाखवली आहे.अशातच न्यूझीलंडचा अष्टपैलू डॅरिल मिचेल (daryl mitchell) याने केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा होताना दिसते.


काय म्हणाला डेरिल मिशेल?


मला वाटतं की, केनची अनुपस्थिती ही काही खेळाडूंना भारतात खेळण्याचा अनुभव देण्याव्यतिरिक्त काही नवीन कॉम्बिनेशन्स वापरून पाहण्याची आणि वेगळे संतुलन निर्माण करण्याची चांगली संधी आहे, असं डेरिल मिशेल (daryl mitchell) म्हणाला. त्यामुळे आता सिरीज गमावली तरीही कीवींना टेन्शन नाही, असं म्हटलं जात आहे.


आणखी वाचा - ICC Men's T20I Team: आयसीसीचा T20I संघ जाहीर, भारताच्या 'या' 3 खेळाडूंना मिळालं स्थान!


दरम्यान, वर्कलोड मॅनेजमेंट लक्षात घेता संघातील खेळाडूंच्या फिटनेसला लक्षात घेऊन टीम इंडिया तिसऱ्या वनडेत (IND vs NZ 3rd ODI) काही बदल करू शकते. स्वत: कॅप्टन रोहित (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) संघातून बाहेर असतील, अशी चर्चा होताना दिसते. मात्र, रोहितने असे संकेत दिले नाहीत. तिसऱ्या वनडेत हार्दिक पांड्याऐवजी शाहबाज अहमदला (Shahbaz Ahmed) खेळवण्याची शक्यता आहे. तर शुभमन गिलची बॅट पुन्हा एकदा तळपणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.