Suryakunar Yadav Hits Hundread International Six : टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवने मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये छाप पाडली आहे. बॅटींगला आल्यावर टी-20 मध्ये खोऱ्याने धावा काढणारा सूर्या अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर करतो. आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर सूर्याला एकदिवसीय संघात जागा मिळाली आहे. मात्र सूर्याला अद्याप लय पकडता आलेली नसल्याचं दिसत आहे. आजच्याही न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात सूर्या लवकर बाद झाला. (IND vs NZ 3rd ODI - Suryakumar Yadav complete 100 sixes in ODI broke mahendra singh dhoni record)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्याने आपल्या 14 धावांच्या लहान खेळीमध्ये दोन षटकार मारले होते. दोन षटकार मारत सूर्याने एक पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादवचे एकूण 100 षटकार पुर्ण झाले आहेत. यामधील 92 षटकार त्याने टी-20  तर उर्वरित 8 षटकार एकदिवसीय क्रिकेटमध्ये मारले आहेत. 


सूर्यकुमार यादवने 100 षटकार हे 61 डावांमध्ये ठोकले असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगाने 100 षटकार मारणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. याआधी हा रेकॉर्ड हार्दिक पंड्याच्या नावावर होता, त्याने 101 डावांमध्ये 100 सिक्सर मारले होते. तर महेंद्र सिंह धोनी तिसऱ्या स्थानी असून 132 डावात तर चौथ्या स्थानी असलेल्या सुरेश रैनाने 166 डावांमध्ये 100 सिक्सर मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला होता. रोहित शर्माला 100 षटकार मारण्यासाठी 166 डाव खेळावे लागले होते. 


भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना न्यूझीलंडसमोर 386 धावांचं आव्हान ठेवलं आहे. यामध्ये रोहित शर्मा 101, शुभमन गिल 112 यांनी शतकी तर हार्दिक पंड्याने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळायचा आहे. 


शुभमन गिलने त्याच्या कारकीर्दीतील चौथं शतक पुर्ण केलं आहे. अवघ्या 72 चेंडूत शुभमनने 125 च्या स्ट्राईक रेटने आपलं शतक मारलं आहे. शुभमन गिलने आपल्या शतकी खेळीमध्ये 13 चौकार आणि 5 षटकार मारले. 23 वर्षीय गिल या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत आहे. द्विपक्षीय वनडे मालिकेत 300 पेक्षा जास्त धावा करणारा गिल भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे.