माऊंट मॉनगनुई : न्यूझीलंडमध्ये सुरू असणाऱ्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेच्या तिसऱ्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात संघात दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले असून यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी आणि विजय शंकर या खेळाडूंना आराम देण्यात आला होता. त्यांच्या ऐवजी दिनेश कार्तिक आणि हार्दिक पांड्याला संघात स्थान देण्यात आलं. या खेळाडूंच्या बळावर आणि संघातील गोलंदाजांच्या विशेष कामगिरीच्या बळावर भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. ४३ व्या षटकात भारतीय संघाने हा सामना जिंकत न्यूझीलंडविरोधोतील मालिकाही खिशात टाकली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने भारतीय संघासमोर २४४ धावांचं आव्हान ठेवलं होतं. त्याचा पाठलाग करताना असताना भारतीय संघाने तीन खेळाडू गमावत हे लक्ष्य गाठलं आणि यजमानांना त्यांच्याच घरात पराभवाचा आणखी एक धक्का दिला. 



पाहा सामन्याचे लाईव्ह अपडेट्स



केन विलियमसन आणि रॉस टेलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी न्यूझीलंडच्या संघाच्या फलंदाजीची जबाबदारी सांभाळली असून, संयमी खेळीचं प्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं पण, विलियमसन २८ धावांवर बाद झाला आणि ही खेळी गडबडली. 


भारताच्या दृष्टीने न्यूझीलंडसोबत खेळला जाणारा तिसरा एकदिवसीय सामना हा आणखी एका कारणामुळे खास आहे. ते म्हणजे हार्दिक पांड्याचं संघातील पुनरागमन. 'कॉफी विथ करण' या चॅट शोमधील वक्तव्यानंतर हार्दिक पांड्याला निलंबत करण्यात आलं होतं. पण, नंतर त्याच्यावरील निलंबनाचा निर्णय मागे घेण्यात आल्यामुळे तोही संघात परतला आहे. त्यामुळे तोसुद्धा प्रभावी खेळाचं प्रदर्शन करत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुख्य म्हणजे या सामन्यात त्याची गोलंदाजी पाहता खऱ्या अर्थाने पांड्याला सूर गवसला आहे, असंच अनेकांचं म्हणणं आहे.