IND vs NZ: वचपा काढणार? न्यूझीलंडकडून टीम इंडियाला 165 धावांचं आव्हान
गुप्टिल आणि मार्कने मिळून रचला धावांचा डोंगर...दोघांच्या अर्धशतकी खेळीनं न्यूझीलंडला मिळालं बळ... आता रोहित शर्मासमोर किवीचं तगडं आव्हान
जयपूर: भारत विरुद्ध न्यूझीलंड जयपूरमध्ये टी 20 सीरिजमधील पहिला सामना खेळवला जात आहे. टीम इंडियाने पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा नाणेफेक जिंकून निर्णय घेतला. न्यूझीलंड संघाने 164 धावा केल्या आहेत. न्यूझीलंड संघाने 6 गडी गमावले. टीम इंडियाला विजयासाठी 165 एवढ्या धावा करायच्या आहे. गुप्टिल आणि मार्कने मिळून धावांचा डोंगर रचला आहे.
मार्टिन गुप्टिलने 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 42 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली आहे. डॅरिल मिशेल डग आऊट झाला. तर मार्कने अर्धशतक ठोकलं. 50 बॉलमध्ये त्याने 63 धावा केल्या आहेत. टिम सेफर्टने 12 धावा केल्या आहेत.
या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 18 ओव्हर 2 बॉलपर्यंत 2 आणि आर अश्विननं 2 विकेट्स आपल्या नावावर केला आहे. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे.
टीम इंडिया Playing XI
रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड टीम Playing XI
टिम साउथी (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट