IND vs NZ: टीम इंडियाने (team India) नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया (team India) मैदानात घाम गाळतेय, तसेच मजामस्ती करताना देखील दिसत आहे. असाच एक मजेशीर फोटो आता टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) समोर आला आहे. हा फोटो पाहून क्रिकेट फॅन्सना खुप आनंद झाला आहे. 


हे ही वाचा : Ind vs Nz पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?


फोटोत काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे मालिकेसाठी टीम इंडिया (team India) मैदानात घाम गाळतेय, तसेच फावळ्या वेळेत मजा मस्ती करताना देखील दिसत आहे. तर टीम इंडियाचा स्टार फलंदाज सुर्यकुमार (Suryakumar Yadav) देखील आपली आवड जपताना दिसत आहे. सध्या हे सर्व खेळाडू विsदेशात आहेत, त्यामुळे त्यांना घरच्या देसी जेवणापासून वंचित रहावे लागत आहे. मात्र विदेशात जो देसी जुगाड करले तो भारतीय कसला. त्यामुळे सुर्याने असाच देसी जुगाड करून जेवणाचा आस्वाद घेतला आहे. 


हे ही वाचा : ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार? 


सुर्याचा देसी जुगाड


टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत त्यांच्या बायका देखील न्युझीलंड टूअरवर आहेत. त्यामुळे त्यांच्या बायकाच त्यांच्या खाण-पाणाची काळजी घेत आहे. त्यामुळे विदेशात देसी जेवण मिळत नसल्याने त्यांच्या बायकाच त्यांच्यासाठी घरचं जेवण बनवत आहे. असेच आता सुर्याची (Suryakumar Yadav) बायको देविशा शेट्टीने (Devisha Shetty) देखील त्याच्यासाठी विदेशात देसी जेवण बनवले आहे. या जेवणाचा आस्वाद घेतानाचा फोटो त्याने पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये त्याने 'विदेश में देशी तडका' अशाप्रकारचे कॅप्शन लिहले होते. त्यामुळे सुर्याच्या विदेशातील देसी तडक्याची चर्चा सुरु झाली होती.



 
सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) न्यूझीलंडविरुद्ध केवळ 51 बॉलमध्ये 111 धावांची नाबाद खेळी केली होती. यामध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश आहे. या शानदार कामगिरीमुळे सूर्यकुमार (Suryakumar Yadav) आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 2 शतके झळकावणारा फलंदाज बनला होता.


दरम्यान आता टी-20 मालिकेनंतर टीम इंडियाला (Team India) 25 नोव्हेंबरपासून 3 सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या मालिकेतही विजय मिळवण्याचा टीम इंडियाचा इरादा असणार आहे.