IND vs NZ 3rd T20I: सध्या सुरू असलेल्या भारत आणि न्यूझीलंड टी-ट्वेंटी मालिकेत भारतीय संघ 1-0 ने आघाडीवर आहे. पहिला सामना पावसाने वाहून गेल्यानंतर दुसऱ्या सामन्यात सुर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) एकाही खेळी (IND vs NZ 2nd T20I) पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणं फिटणं. एकीकडे भारताच्या एकामागे एक विकेट पडत असताना दुसरीकडे सुर्यकुमारने नॉट आऊट शतक (Suryakumar Yadav Century) ठोकलं. या सामन्यात सुर्याने 51 चेंडूत 111 धावांची धुंवाधार पारी खेळली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूर्यकुमार यादवने एका वर्षात T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये दोन शतकं झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला (Two T20I centuries in a calendar year) आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 2018 मध्ये हा विक्रम केला होता. सूर्यकुमारने चालू सिझनमध्ये आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे. T20 इंटरनॅशनलमध्ये मध्ये तो सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरलाय.



टी-ट्वेंटी फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा तो यावर्षातील एकमेव फलंदाज आहे. सूर्याने या वर्षात आतापर्यंत एकूण 70 षटकार खेचले आहेत आणि तो एका या वर्षात रोहित शर्माच्या 78 षटकारांचा विक्रम मागे टाकण्याच्या जवळ आहे. दुसरीकडे सूर्याने T20 इंटरनॅशनल सामन्यांमध्ये एकूण 67 सिक्स मारले आहेत, तर 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याला केवळ 3 षटकार मारता आले आहेत. आणखी 9 षटकार मारण्यासोबतच तो रोहितला (Most T20I sixes in a calendar year) मागे टाकेल.


आणखी वाचा - Suryakumar Yadav: एकटा सुर्या न्यूझीलंडवर भारी! T20 मध्ये केली रोहितच्या 'या' खास रेकॉर्डची बरोबरी


दरम्यान, यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत. त्यात त्यानं 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने 25 सामन्यात 996 धावा केल्या आहेत.