Suryakumar Yadav: एकटा सुर्या न्यूझीलंडवर भारी! T20 मध्ये केली रोहितच्या 'या' खास रेकॉर्डची बरोबरी

Suryakumar Yadav Century:सुर्याचे एकाही खेळी (IND vs NZ 2nd T20I) पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणं फिटणं. एकीकडे भारताच्या एकामागे एक विकेट पडत असताना दुसरीकडे सुर्यकुमारने नॉट आऊट शतक (Suryakumar Yadav Century) ठोकलं.

Updated: Nov 20, 2022, 04:27 PM IST
Suryakumar Yadav: एकटा सुर्या न्यूझीलंडवर भारी! T20 मध्ये केली रोहितच्या 'या' खास रेकॉर्डची बरोबरी title=
Suryakumar Yadav

IND vs NZ 2nd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डनवर 2014 साली भारताचा सलामीवीर रोहित शर्माने 264 धावांची वादळी (Rohit Sharma) खेळी केली. रोहित शर्माचं दुहेरी शतक आजही सर्वांना आठवत असेल. अशीच काहीसं वादळ आज न्यूझीलंडच्या मैदानावर (NZ vs IND) आलं. त्याचं नाव होतं सुर्यकुमार यादव... सुर्याने (Suryakumar Yadav) न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 51 चेंडूत 111 धावांची धुंवाधार पारी खेळली. यावेळी सुर्याने तब्बल 11 चौकार तर 7 गगनचुंबी षटकार खेचले.

सुर्याचे एकाही खेळी (IND vs NZ 2nd T20I) पाहून अनेकांच्या डोळ्याचे पारणं फिटणं. एकीकडे भारताच्या एकामागे एक विकेट पडत असताना दुसरीकडे सुर्यकुमारने नॉट आऊट शतक (Suryakumar Yadav Century) ठोकलं. तर सुरूवातीला ईशान किशनने 36 धावा करत त्याला साथ दिली. मात्र, दुसरीकडे सुर्याच्या प्रकाशापुढे न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा टिकाव लागला नाही.

आणखी वाचा - IND vs NZ 2nd T20: डीडी स्पोर्ट्सवर भारत-न्यूझीलंड T20 मॅच का दिसत नाहीए? जाणून घ्या

रोहितच्या विक्रमाची बरोबरी

सूर्यकुमार यादवने एका वर्षात T20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमध्ये दोन शतकं झळकावणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला (Two T20I centuries in a calendar year) आहे. त्याआधी टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 2018 मध्ये हा विक्रम केला होता. सूर्यकुमारचे T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे दुसरं शतक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला सूर्यकुमारने इंग्लंडविरुद्ध 55 चेंडूत 117 धावांची खेळी केली होती. त्या सामन्यात त्याने 48 चेंडूत शतक झळकावले होते, तर न्यूझीलंडविरुद्ध सूर्याने 49 चेंडूत शतक पूर्ण केलंय.

दरम्यान, यंदा T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सूर्यकुमारच्या नावावर आहे. सुर्याने 2022 मध्ये 30 सामन्यांमध्ये 1151 धावा केल्या आहेत. त्यात त्यानं 2 शतके आणि 9 अर्धशतके झळकावली आहेत. या यादीत पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान दुसऱ्या क्रमांकावर आहे. रिझवानने 25 सामन्यात 996 धावा केल्या आहेत.