जयपूर: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी 20 सीरिजमधील पहिला सामना झाला. या सामन्या टीम इंडिया 5 विकेट्सने जिंकला आहे. ऋषभ पंतने शेवटचा षटकार ठोकून सामना जिंकला. या विजयात खऱ्या अर्थानं सूर्य तळपला असं म्हणायला हरकत नाही. टीम इंडियाने टी 20 विश्वचषकाच्या पराभवाचा वचपा काढला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल यांनी आपलं उत्तम कसब दाखवलं. दीपक चाहर मात्र आपल्या कामगिरीत कमी पडला. त्यामुळे त्याने अनेक धावा किवी फलंदाजांना दिल्या. 


किवी संघाने टीम इंडियासमोर 165 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. हे लक्ष्य टीम इंडिया 


के एल राहुलने 14 बॉलमध्ये प्रत्येक एक चौकार आणि षटकाराच्या मदतीनं 15 धावा केल्या. रोहित शर्मा अर्धशतकापासून केवळ 2 धावा दूर राहिला आहे. त्याने 2 षटाकर आणि 5 चौकारांच्या मदतीनं 48 धावा केल्या. 


सूर्यकुमार यादवने आजच्या सामन्यात सर्वात मोठा पल्ला गाठला. त्याने 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं 40 बॉलमध्ये सर्वाधिक 62 धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने 13 आणि श्रेयस अय्यरने 5 धावा केल्या आहेत.


मार्टिन गुप्टिलने 3 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीनं 42 बॉलमध्ये 70 धावांची खेळी केली आहे. डॅरिल मिशेल डग आऊट झाला. तर मार्कने अर्धशतक ठोकलं. 50 बॉलमध्ये त्याने 63 धावा केल्या आहेत. टिम सेफर्टने 12 धावा केल्या आहेत. 


या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 18 ओव्हर 2 बॉलपर्यंत 2 आणि आर अश्विननं 2 विकेट्स आपल्या नावावर केला आहे. भुवनेश्वर कुमार, अक्षर पटेल या दोघांनी चांगली कामगिरी केली आहे. 


टीम इंडिया Playing XI


रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज


न्यूझीलंड टीम Playing XI
टिम साउथी (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट