IND VS NZ 2nd and 3rd Test Team India Squad : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात तीन सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून बंगळुरू येथे पार पडलेला सामना हा न्यूझीलंडने 8 विकेट्सने जिंकला. यासह न्यूझीलंडने तब्बल 36 वर्षांनी भारतात टीम इंडिया विरुद्ध टेस्ट सामना जिंकला. आता न्यूझीलंडने सीरिजमध्ये 0-1  ने आघाडी घेतली असून दुसरा आणि तिसरा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाने रविवारी रात्री भारताचा संघ जाहीर केला. यात 25 वर्षीय ऑल राउंडर खेळाडूला संधी देण्यात आलेली आहे. 


4 टेस्टमध्ये केल्यात 3 हाफ सेंच्युरी :


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत - न्यूझीलंड दुसऱ्या आणि तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियात समावेश केलेल्या खेळाडूचं नाव वॉशिंग्टन सुंदर असून तो एक ऑल राउंडर खेळाडू आहे. उत्कृष्ट फलंदाजी सोबतच तो स्पिन गोलंदाजी सुद्धा करतो. वॉशिंग्टन सुंदरने शेवटचा टेस्ट सामना खेळून 3 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्याने शेवटचा टेस्ट सामना हा 4 मार्च 2021 रोजी अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. ब-याच कालावधीनंतर सुंदरचे टीम इंडियात पुनरागमन झाले आहे.


कसा आहे वॉशिंग्टन सुंदरचा टेस्ट रेकॉर्ड? 


वॉशिंग्टन सुंदरचा जन्म 5 ऑक्टोबर 1999 रोजी चेन्नईत झाला असून जानेवारी 2021 मध्ये त्याने भारताकडून टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यावेळी त्याने फक्त 4 टेस्ट सामने खेळले ज्यात 6 इनिंगमध्ये त्याने 3 हाफ सेंच्युरी केल्या. सुंदरीच्या फलंदाजीची सरासरी ही 66 धावांहून अधिकची आहे. तसेच टेस्टच्या 6 इनिंगमध्ये सुंदरीने त्याच्या गोलंदाजीने भारताला 6 विकेट्स मिळून दिले होते. आता पुन्हा एकदा भारतीय संघात वॉशिंग्टन सुंदरला स्थान मिळाल्याने फलंदाजी आणि गोलंदाजीत तो भारतासाठी एक चांगला पर्याय राहील. 


हेही वाचा : भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरी टेस्ट मॅच पुण्यात, कुठे आणि कशी बुक कराल तिकिटं?



टीम इंडियात कोणा कोणाला संधी? 


न्यूझीलंड विरुद्ध पुण्यात आणि मुंबईत होणाऱ्या टेस्ट सामन्यांसाठी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली असून यात वॉशिंग्टन सुंदर सह शुभमन गिलचे देखील पुनरागमन झाले आहे. बंगळुरू टेस्टमध्ये शुभमन गिलला विश्रांती देण्यात आली होती, मात्र याचा फटका फलंदाजीत टीम इंडियाला जाणवला. 


भारतीय संघ :


रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, ऋषभ पंत (विकेटकिपर), ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव , मोहम्मद. सिराज, आकाश दीप, वॉशिंग्टन सुंदर.