IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंडधील पहिल्या वनडे सामन्यामध्ये (IND vs NZ) भारताचा पराभव झाला आहे. भारताने 300 धावा करूनही त्यांना पराभवाचं तोंड पहावं लागलं. 307 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या टॉम लेथम नाबाद 145 धावा (Tom Latham) आणि कर्णधार केन विलियम्सनच्या नाबाद 94 (Kane Williamson) धावांच्या जोरावर 7 विकेट्सने विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा हुकमी एक्का असलेल्या टीम साईदीने (Tim Southee) एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. (ind vs nz Team Saudi the first to World Record latest Marathi Sport News)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताचा कर्णधार शिखर धवनला बाद करत टीम साऊदीने वनडे क्रिकेटमध्ये 200 वा बळी घेतला आहे. साऊदी हा टी-20 100 पेक्षा जास्त 134, वनडेमध्ये 200 तर कसोटीमध्ये 300 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. न्यूझीलंडकडून वनडेमध्ये 200 विकेट्स घेणारा तो पाचवा गोलंदाज आहे. 


न्यूझीलंडच्या यशस्वी गोलंदाजांपैकी टीम साऊदी एक गोलंदाज आहे. साऊदीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आतापर्यंत एकूण 134 विकेट घेतल्या आहेत. आजच्या सामन्यामध्ये सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या, यामध्ये भारताचा कर्णधार शिखर धवन, श्रेयस अय्यर आणि शार्दुल ठाकुर यांना बाद केलं. 


टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत 307 रन्सचं लक्ष्य टीमसमोर ठेवलं. यावेळी न्यूझीलंडची फलंदाजी करताना सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर टॉम लेथम आणि केन विलियम्सनच्या तुफान खेळीने भारताच्या वाटेचा विजय न्यूझीलंडने हिसकावला. यावेळी टॉमने नाबाद 145 तर केनने नाबाद 94 रन्सची खेळी केली. दरम्यान, तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरूवात झाली आहे. न्यूझीलंड संघाने पहिला सामना जिंकत 1-0 ने विजय मिळवला आहे.