Virat Kohli vs Suryakumar Yadav : विराट कोहली मैदानात असताना नॉनस्टाईक एन्डच्या खेळाडूला धास्तीच बसते. कारण रन्स धावण्याच्या बाबतीत विराटचा (Virat Kohli) कोणी हातच धरू शकत नाही. विराटसोबत धावता खेळाडूंच्या धापा भरतात. पण विराट मात्र सुसाट सुटतो. सध्या विराट कोहली ट्रोल होतोय तो सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) रनआऊटमुळे... विराट कोहली शतक ठोकण्यासाठी स्वार्थी झालाय, अशी टीका सात्त्याने त्याच्यावर होत असते. मात्र, आता पुन्हा विराट नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आलाय. विराट कोहलीने सूर्यकुमारला मुद्दामहून आऊट (Run Out) केलं का? असा सवाल सध्या विचारला जात आहे. सामन्यात नेमकं काय झालं होतं? नेमकी चूक कोणाची होती? पाहूया...


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडने दिलेल्या 274 धावांचा पाठलाग करताना टीम इंडिया अडखळत आव्हान पार करत होती. टीम इंडियाच्या 4 विकेट गेल्यानंतर डेब्यू करणारा सूर्यकुमार यादव मैदानात आला. त्यावेळी टीम इंडियाला 83 धावांची गरज... सामन्याची 34 वी ओव्हर सुरू होती. त्यावेळी न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट गोलंदाजी करत होता. बोल्टच्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर सूर्याने एक फटका मारला. त्यावेळी एक धाव घेणं अवघड होतं. मात्र, चोरटी धाव निघाली असती. फटका मारल्यावर सूर्याने विराटला धाव घेण्याचा इशारा केला आणि सूर्या सुसाट निघाला. तेव्हा विराट नॉन स्टाईकवर असताना सावध भूमिका घेऊन उभा होता. चोरटी धाव घेण्याच्या नादात विकेट गेली तर विजय मिळवता येणार नाही, हे विराटला पक्कं माहित होतं. मात्र, सूर्याने रन घेतल्यानंतर विराटला त्या रिस्पॉन्स दिला नाही. विराटच्या दृष्टीने हा रन घेता येत नव्हता. फिल़्डरने चूक न करता विकेटकिपरकडे थ्रो केला. विराट धाव घेत नाही, हे लक्षात आल्यावर सूर्याने आपली विकेट थ्रो केली आणि तो स्टाईकच्या दिशेने पळाला. त्यानंतर विकेटकिपरने आपलं काम केलं अन् सूर्यकुमार यादव धावबाद झाला.


विकेट गेल्यानंतर सूर्याने विराटकडे पाहिलं देखील नाही आणि तो डगआऊटच्या दिशेने निघून गेला. डेब्यू सामन्यात एवढी मोठी चूक झाल्याचं त्याच्या लक्षात आलं आणि शांतपणे मनात राग धरून सूर्या निघून गेला. त्यावेळी विराटचा चेहरा देखील पाहण्याजोगा होता. विराटच्या चेहऱ्यावर पश्चाताप दिसत होता. सूर्यकुमार बाद झाल्यानंतर विराटची बॉडी लॅग्वेज बदलेली दिसली. जडेजा मैदानात आल्यानंतर त्याने स्वत: जबाबदारी घेतली अन् लढत दिली. 


नेमकी चूक कोणाची? 


धाव घेण्याचा कॉल हा सूर्यकुमार यादवचा होता. त्यामुळे विराटने त्याला प्रतिसाद देयला हवा होता अन् धाव पूर्ण करायला हवी होती. मात्र, विराटने चूक केली, असं तज्ज्ञ म्हणतात. मात्र, विराटला आपली विकेट थ्रो करणं बरोबर वाटलं नाही, ही हुद्द्याची गोष्ट होती. विराट मैदानात सेट झाला होता. त्यामुळे सामना जिंकण्यासाठी विराट मैदानात असणं गरजेचं होतं. विराटने धाव घेतली नाही, हा देखील योग्य निर्णय होता, असं देखील क्रिडातज्ज्ञ सांगतात. सूर्याने घाई केली. मात्र, त्याने पुन्हा स्टाईकच्या दिशेने जाऊन माघार घेतली. त्यामुळे सूर्याचं देखील कौतूक होतंय.


पाहा Video



न्यूझीलंड : डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (WK), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.


टीम इंडिया : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (WK), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.