IND vs NZ: पंतला जर्सीवर चिकटपट्टी लावून मैदानात उतरण्याची वेळ
रिषभ पंतला जर्सीवर चिकटपट्टी लावून मैदानात उतरण्याची वेळ का आली? जाणून घ्या कारण
रांची : न्यूझीलंड विरुद्ध दुसऱ्या टी 20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. यासह टीम इंडियाने टी 20 सीरिजमध्ये 2-0 ने आघाडी घेतली आहे. न्यूझीलंड विरुद्ध टी 20 वर्ल्ड कपमध्ये पराभूत झालेल्याचा वचपा टीम इंडियाने इथे काढला.
दोन्ही सामन्यात टीम इंडियासाठी विजय मिळवून देणारा शेवटचा शॉर्ट रिषभ पंतने खेळला होता. दुसऱ्या सामन्यात मात्र रिषभ पंत एक वेगळ्या कारणासाठी चर्चेत आला. त्याचा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.
रिषभ पंत मैदानात उतरताना जर्सीवर चिकटपट्टी लावून मैदानात उतरला होता. त्याचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. रिषभ पंत टी 20 वर्ल्ड कपमधील टीम इंडियाची जर्सी घालून खेळायला मैदानात उतरला होता. त्याच्या उजव्या बाजूला टी 20 वर्ल्ड कपचा लोगो होता.
हा लोगो लपवण्यासाठी पंतने त्यावर टेप लावली होती. सामन्याच्या मध्यभागी, त्याने त्यावर अर्धा स्वेटर घातला होता, त्यानंतर त्याची टेप दिसत नव्हती. टी-20 वर्ल्ड कपनंतर लगेचच ही टी-20 सीरिज खेळवली जात आहे.
भारताकडून या सामन्यात पंतने 6 चेंडूत 12 धावा केल्या. पंतला पहिल्या चार चेंडूंमध्ये एकही धाव करता आली नाही आणि त्यानंतर त्याने सलग दोन षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.