मुंबई :  भारतीय फलंदाज रोहित शर्माने म्हटले की त्यांची टीम २२ ऑक्टोबरपासून न्यूझीलंड विरूद्ध सुरू होणाऱ्या सिरीजसाठी तयार आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच आगामी तीन सामन्यात गेल्या सिरीजप्रमाणे कामगिरी करण्यावर आमचा भर असेल विश्वास रोहित शर्माने व्यक्त केला आहे. 


लय कायम राखणार


भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित सराव सत्रानंतर पत्रकारांशी बोलत होता.  तो म्हणाला, न्यूझीलंडने भारतात दोन सराव सामने खेळले आहे. त्यांनी परिस्थितीशी जुळवून घेतले आहे. टीम म्हणून आम्ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध जशी कामगिरी केली त्याचीच पुनारावृत्ती करू इच्छितो. 


तो म्हणाला, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड मालिकेत जास्त अंतर नाही ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आम्ही तशीच कामगिरी करू इच्छितो,  कारण आमचे खेळाडू आता लयमध्ये आहेत. 


प्रत्येक सिरीज वेगळी असते 


रोहितने स्वीकार केले की, प्रत्येक सिरीज ही वेगळी असते, प्रत्येक सिरीजचे आव्हाने वेगवेगळी असतात. आता आमच्यासमोर आव्हान आहे की लवकरात लवकर विरोधी टीमला समजून आपली रणनिती आखायला हवी. 


वेगळी रणनिती आखणार 


आम्ही ऑस्ट्रेलियाविरूद्ध ४-१ ने जिंकलो आहे, त्यांची टीम वेगळ्या प्रकारची होती. न्यूझीलंडची टीमची वेगळी आहे. त्यानुसार आम्ही रणनिती आखणार आहे.