India Vs Pakistan T20 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज सामना खेळला जात आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार असून सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. दुबईत होणाऱ्या या सामन्यात टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कपमधील पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन मोठ्या संघांचा हा सामना असल्याने खेळाडूंवर मोठे दडपण असते. पण तरीही टीम इंडियाचे पारडे जड आहे, कारण टीममध्ये मोठ्या खेळाडूंची फौज आहे. हाय होल्टेज सामना खेळण्याचा अनुभवही भारताला आहे.


1. रोहित-राहुल ओपनिंग:


रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर टीम इंडियाने फलंदाजीची पद्धत बदलली आहे. आता पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. केएल राहुल रोहितसोबत परतत आहे, त्यामुळे दोघांकडूनही स्फोटक फलंदाजीची अपेक्षा आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात दोघेही अपयशी ठरले होते, पण यावेळी त्यांच्या कामगिरीवर भारताचा विजय निश्चित करेल.


2. विराट कोहलीचे पुनरागमन


टीम इंडियाचा किंग विराट कोहली तब्बल दीड महिन्यानंतर मैदानात परतत आहे. पाकिस्तानविरुद्ध त्याचे पुनरागमन होत आहे. कोहलीला मोठ्या सामन्यात धावा करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे चाहत्यांच्या आशा त्याच्यावर टिकून आहेत. विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धच्या टी-20 सामन्यातील रेकॉर्ड शानदार आहे. त्याने 7 सामन्यात 78 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत.


3. सूर्यकुमार यादवची स्फोटक फलंदाजी


गेल्या एका वर्षात सूर्यकुमार यादव टी-20 क्रिकेटमध्ये भारतासाठी मोठा खेळाडू म्हणून उदयास आला आहे. विराट कोहलीनंतर चौथ्या क्रमांकावर आल्यास तो सुरुवातीपासूनच बॉलर्सवर तुटून पडतो. पाकिस्तानच्या अनेक खेळाडूंनी अद्याप सूर्यकुमार यादवचा खेळ पाहिलेला नाही, अशा परिस्थितीत त्याचे अप्रतिम फटके उपयुक्त ठरू शकतात.


4. सर्वोत्तम फिनीशर


टीम इंडियाकडे सध्या टी-20 संघात तीन-तीन सर्वोत्तम फिनिशर आहेत. हार्दिक पंड्याने जोरदार पुनरागमन केले आहे, ऋषभ पंतही पाचव्या क्रमांकावर येऊन वेगवान धावा करू शकतो. तसेच, दिनेश कार्तिकला प्लेइंग-11 मध्ये स्थान मिळाले तर तो देखील चांगले शॉट्स खेळू शकतो.


5. अनुभवी आणि नवीन बॉलर्सचं कॉम्बिनेशन


भारतीय संघात जसप्रीत बुमराह नसला तरी टीम इंडियाची गोलंदाजी अजूनही मजबूत आहे. भुवनेश्वर कुमारचा अनुभव आणि स्विंग, तसेच अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांचा वेग टीम इंडियासाठी उपयुक्त ठरेल. विशेष म्हणजे या दोघांनी आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली असून ते पाकिस्तानी फलंदाजांसाठी नवीन असतील. यासह युझवेंद्र चहल किंवा रवींद्र जडेजा प्लेइंग-11 मध्ये असतील तर दुबईच्या मैदानात फिरकी गोलंदाज चमत्कार करू शकतात.