Asia Cup: टीम इंडिया कधी करणार पाकिस्तान दौरा? कर्णधार Rohit sharma चं उत्तर
आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहतायत.
मुंबई : आशिया कप 2022 मध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी होणार आहे. आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्याची जगभरातील क्रिकेट चाहते आतुरतेने वाट पाहतायत. गेल्या वर्षी टी-20 वर्ल्डकपच्या वेळी या मैदानावर दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा बाबर आझमच्या टीमने भारताचा 10 गडी राखून पराभव केला होता. आता भारतीय टीमला त्या पराभवाचा बदला घेण्याची मोठी संधी आहे.
या सामन्याच्या पूर्वसंध्येला टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित होता. पत्रकार परिषदेत रोहित शर्माने भारतीय टीमची रणनीती, प्लेइंग-11 अशा अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.
यादरम्यान एका पत्रकाराने रोहित शर्माला टीम इंडियाच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत प्रश्न विचारला. त्या पाकिस्तानी पत्रकाराच्या प्रश्नाला रोहित शर्माने असं उत्तर दिलं की, पत्रकार परिषदेत उपस्थित लोक हसू लागलेत.
रोहित शर्माने दिलं उत्तर
रोहित शर्मा म्हणाला, 'माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर असतं तर मी नक्की उत्तर दिलं असतं. काय करावं आणि काय करू नये हे बोर्ड ठरवतील. हे आपल्या हातात नाहीत. समोर जे काही टूर्नामेंट आहे ते खेळायला आम्ही तिथे पोहोचतो. आम्हाला जिथं पाठवलं जाईल तिथे आम्ही खेळू. हा खूप अवघड प्रश्न आहे. बोर्डाने ठरवले तर आम्ही खेळू."
2008 नंतर टीम इंडिया पाकिस्तानला गेलेली नाही
2008 पासून टीम इंडियाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. राजकीय आणि राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देशांच्या टीम अद्याप द्विपक्षीय मालिका खेळत नाहीत. 2012-13 मध्ये भारतीय भूमीवर दोन्ही देशांदरम्यान शेवटची द्विपक्षीय मालिका झाली होती. त्यानंतर पाकिस्तानने तीन एकदिवसीय आणि दोन टी-20 सामन्यांसाठी भारताचा दौरा केला. पाकिस्तान टीमने एकदिवसीय मालिकेत 2-1 असा विजय मिळवला, तर टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली.