मुंबई : क्रिकेटप्रेमींसाठी एक चांगली बातमी आहे. जे क्रिकेट प्रेमी भारत आणि पाकिस्तानमधील मॅच पाहण्यास उत्सुक आहेत त्यांच्यासाठी तर ही मोठी बातमी आहे. कारण पाकिस्तान क्रिकेट टीमचा आता भारतात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


PAK खेळाडूंना मिळाणार व्हिसा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑक्टोबरमध्ये भारतात होणाऱ्या आयसीसी टी -20 वर्ल्डकपसाठी (ICC T20 World Cup 2021) पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंना व्हिसा मिळणार आहे. सरकारकडून आश्वासन मिळाल्यानंतर बीसीसीआयच्या अ‍ॅपेक्स काउंन्सिलचे (Apex Council) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ही माहिती दिली आहे.


टी -20 वर्ल्ड कप फायनल अहमदाबादमध्ये


जय शहा यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी संघांला व्हिसा मिळणार असल्याची माहिती दिली.  त्यानंतर त्यांनी टी -20 वर्ल्ड कप (T20 World Cup) भारतात 9 ठिकाणी होईल आणि अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होईल, असेही सांगितले आहे.


या 9 ठिकाणी खेळले जाणार सामने


आयसीसी टी -20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021) चे सामने अहमदाबाद (Ahmedabad), दिल्ली (Delhi), मुंबई (Mumbai), चेन्नई (Chennai), कोलकाता (Kolkata), बेंगलुरू (Bengaluru), हैदराबाद (Hyderabad), धर्मशाला (Dharamshala) आणि लखनऊ (Lucknow) मध्ये खेळले जाणार आहेत.


अखेर व्हिसाचा प्रश्न सुटला


बीसीसीआयच्या अ‍ॅपेक्स काउंन्सिलच्या सदस्यांनी सांगितले की, "पाकिस्तान क्रिकेट टीमच्या व्हिसाचा (Visa) प्रश्न सुटला आहे." परंतु, हे सामने पाहाण्यासाठी प्रेक्षकांना यायला परवानगी दिली जाईल की, नाही हे अद्याप स्पष्ट झाले नाही. राजकिय संबंधांमधील तणावामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये दशकभर तरी बाइलेट्रल क्रिकेट खेळले गेलेले नाही, त्यामुळे टी -20 वर्ल्ड कप 2021 मध्ये क्रिकेट चाहत्यांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे.