IND vs PAK `महामुकाबला` किती वाजता सुरू होईल? जाणून घ्या वेळ आणि सर्वकाही एका क्लिकवर...
IND vs PAK `महामुकाबला` - दोन्ही संघ आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत...
IND vs PAK : T20 world cup 2022 ला धमाकेदार अंदाजात सुरुवात झाली आहे. क्वालिफायर आणि सराव सामने खेळले गेले. त्यानंतर आता 22 ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून सुपर 12 सामन्यांना सुरूवात झाली आहे. त्यानंतर 23 ऑक्टोबरला भारत आणि पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात शानदार सामना होणार आहे.
IND vs PAK हा सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. आशिया चषक 2022 मध्ये एकमेकांविरुद्ध दोन सामने खेळल्यानंतर, दोन्ही संघ यावर्षी तिसऱ्यांदा एकमेकांशी लढण्यासाठी सज्ज झाले आहेत. भारत आणि पाकिस्तान हे ICC T20 विश्वचषक 2022 मधील गट 2 चे भाग असल्याने वर्ल्ड कपची सुरूवातच धमाकेदार झाली आहे.
सामना कुठे असेल?
दोन्ही संघ आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत. IND vs PAK सामना हा सुपर 12 फेरी अंतर्गत स्पर्धेतील 16 वा सामना असेल. हा सामना 23 ऑक्टोबर रोजी म्हणजे उद्या खेळला जाईल. स्ट्रेलियातील मेलबर्नमधील मेलबर्न क्रिकेट स्टेडियम हे या सामन्याचे ठिकाण आहे.
सामन्याची वेळ काय?
सामना स्थानिक वेळेनुसार म्हणजे भारतीय वेळेनुसार दुपारी 1:30 PM ला सुरु होईल. त्यावेळी ऑस्ट्रेलियामध्ये संध्याकाळचे 7 वाजले असतील. भारतीय संघाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे तर बाबर आझम पाकिस्तानचा संघ घेऊन मैदानात उतरेल.
पावसाचा अंदाज -
सामना सुरू होण्याच्या वेळेच्या आसपास पाऊस अपेक्षित असल्याने विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाठलाग करणाऱ्या संघाला पीच अनुकूल ठरू शकते. टॉसला उशीर झाल्यास आणि ओव्हरची संख्या देखील कमी होऊ शकते. दोन्ही कॅप्टन गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा ठेवू शकतात. सामन्य़ासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही.
दोन्ही संघ -
टीम इंडिया: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, आर अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी.
राखीव खेळाडू: श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज.
आणखी वाचा - Virat kohli: किंग कोहली सचिनचा 'तो' रेकॉर्ड मोडणार? विराट फक्त एक पाऊल मागे...
पाकिस्तान संघ: बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, उस्मान कादिर.
राखीव खेळाडू: मोहम्मद हारिस, शाहनवाज दहनी.